शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

वनप्लस-सॅमसंगच्या नाकात दम करण्यासाठी आला Realme GT 2 Pro; वेड लावणाऱ्या फीचर्ससह भारतात एंट्री 

By सिद्धेश जाधव | Updated: April 7, 2022 16:26 IST

Realme GT 2 Pro स्मार्टफोननं भारतात 12GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह एंट्री घेतली आहे.

Realme आज भारतात आपला पेटारा उघडला आहे. कंपनीनं बजेट सेगमेंटमध्ये Realme 9 4G स्मार्टफोन सादर केला आहे. त्याचबरोबर Realme Air buds 2, Realme Book Prime आणि Realme FHD TV Stick देखील भारतीयांच्या भेटीला आले आहेत. परंतु 12GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह आलेला Realme GT 2 Pro स्मार्टफोन यावर्षीचा सच्चा फ्लॅगशिप किलर म्हणता येईल.  

Realme GT 2 Pro चे स्पेसिफिकेशन 

रियलमी जीटी 2 प्रो स्मार्टफोन 2K LTPO AMOLED डिस्प्लेसह येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. हा एक 1440 x 3216 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1400निट्स ब्राईटनेस, 5000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि 1.07 बिलियन कलरला सपोर्ट करतो. कंपनीनं या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा दिली आहे.  

फोटोग्राफीसाठी हा फ्लॅगशिप रियलमी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स766 सेन्सर आहे. सोबत 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. समोर 32 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स615 सेन्सर सेल्फी कॅमेऱ्याचे काम करतो. 

शक्तिशाली Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट realme GT 2 Pro स्मार्टफोनची खासियत म्हणता येतील. हा फोन अँड्रॉइड 12 ओएस आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. कंपनीनं यात 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देखील दिली आहे. या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W SuperDart फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

Realme GT 2 Pro ची किंमत 

या फोनचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेल 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या टॉप एन्ड मॉडेलची किंमत 57,999 रुपये आहे. हा फोन पेपर व्हाईट आणि पेपर ग्रीन कलरमध्ये विकत घेता येईल. Realme GT 2 Pro मोबाईल कंपनीच्या वेबसाईट आणि Flipkart वर 14 एप्रिलपासून उपलब्ध होईल.  

टॅग्स :realmeरियलमीMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड