शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

फीचर्सपासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 12GB RAM, 65W फास्ट चार्जसह Realme GT 2 लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: April 22, 2022 17:16 IST

Realme GT 2 स्मार्टफोननं भारतात 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह एंट्री घेतील आहे.  

Realme GT 2 Pro काही दिवसांपूर्वी भारतात आला आहे. तेव्हपासून भारतीय चाहते या फोनच्या वॅनिला व्हर्जनची वाट बघत आहेत. रियलमीनं कोणताही गाजावाजा न करता किफायतशीर फ्लॅगशिप Realme GT 2 स्मार्टफोन लाँच केला आहे. यात 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 5000mAh बॅटरी, Snapdragon 888 5G SoC आणि 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.  

Realme GT 2 ची किंमत 

Realme GT 2 स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 34,999 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 38,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन पेपर ग्रीन, पेपर व्हाइट आणि स्टील ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये कंपनीच्या वेबसाईटसह Flipkar वरून 28 एप्रिलपासून विकत घेता येईल.  

Realme GT 2 चे स्पेसिफिकेशन्स  

रियलमी जीटी 2 स्मार्टफोनमध्ये 6.62 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि एड्रेनो 660 जीपीयूला देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेज मिळेल.  

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी 2 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स776 सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स471 सेन्सर फ्रंट कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे. Realme GT 2 5G फोन बेसिक कनेक्टिव्हिटीफीचर्ससह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी 65वॉट फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान