शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

12 हजारांच्या आत Realme चा 5000mAh बॅटरी असलेला फोन लाँच; असे आहेत भन्नाट Realme C35 चे स्पेसिफिकेशन्स 

By सिद्धेश जाधव | Updated: March 8, 2022 11:38 IST

Realme C35 Mobile: Realme C35 स्मार्टफोन कंपनीनं भारतात 50MP Camera, 5,000mAh battery, 4GB RAM आणि Unisoc T616 चिपसेटसह बजेटमध्ये सादर केला आहे.

Realme नं भारतातील लो बजेट सेगमेंटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं Realme C35 सादर करून रेडमीच्या अडचणीत वाढ केली आहे. या फोनमध्ये 50MP Camera, 5,000mAh battery, 4GB RAM आणि Unisoc T616 चिपसेट, असे स्पेक्स देण्यात आले आहेत. रियलमीनं या नवीन मोबाईलची किंमत 11,999 रुपये ठेवली आहे.  

Realme C35 ची किंमत 

रियलमी सी35 स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते, ज्याची किंमत 11,999 रुपये आहे. तर टॉप एन्ड व्हेरिएंटमध्ये 4GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते आणि कंपनीनं या मॉडेलची किंमत 12,999 रुपये ठेवली आहे. रियलमी सी35 येत्या 12 मार्चपासून शॉपिंग साईट फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. हा डिवाइस Glowing Green आणि Glowing Black कलरमध्ये विकत घेता येईल. 

Realme C35 चे स्पेसिफिकेशन्स  

रियलमी सी35 स्मार्टफोनमधील 6.6 इंचाचा फुलएचडी+ वॉटर ड्रॉप डिस्प्ले 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात 600निट्स ब्राईटनेस आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या रियलमी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, एक मॅक्रो लेन्स आणि एक ब्लॅक अँड व्हाईट लेन्स देण्यात आली आहे. फोनमधील फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. 

हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी युआयच्या आर एडिशनवर चालतो. याला Unisoc T616 चिपसेटची प्रोसेसिंग पावर आणि एआरएम माली जी57 जीपीयू देण्यात आला आहे. सोबत 4GB RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते.बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर मिळतं. तर पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. 

हे देखील वाचा:

टॅग्स :realmeरियलमीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड