शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ठरलं तर! 31 मार्चला येणार रियलमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन; दिवसभर टिकणाऱ्या बॅटरीची जोड  

By सिद्धेश जाधव | Updated: March 25, 2022 13:00 IST

Realme C31 स्मार्टफोन 31 मार्चला भारतात लाँच केला जाईल. हा फोन Realme C21 स्‍मार्टफोनची जागा घेईल.

Realme चा दमदार फ्लॅगशिप Realme GT 2 Pro लवकरच भारतीयांच्या भेटीला येणार आहे. परंतु म्हणून कंपनीनं बजेट सेगमेंटकडे दुर्लक्ष केलेलं नाही. कंपनीनं अधिकृतपणे सांगितलं आहे की Realme C31 स्मार्टफोन 31 मार्चला भारतात लाँच केला जाईल. हा फोन Realme C21 स्‍मार्टफोनची जागा घेईल. जागतिक बाजारात याआधीच लाँच झाल्यामुळे रियलमी सी31 चे स्पेसिफिकेशन्स उपलब्ध आहेत.  

Realme C31 चे स्पेसिफिकेशन्स 

रियलमी सी31 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय आर एडिशनवर चालतो. कंपनीनं यात ऑक्टकोर UniSoC T612 प्रोसेसरचा वापर केला आहे. सोबत 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यांतची इंटरनल स्टोरेज मिळते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  

फोटोग्राफीसाठी रियलमी सी31 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची ब्लॅक अँड व्हाईट लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच पावर बॅकअपसाठी रियलमी सी31 स्मार्टफोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

Realme C31 ची किंमत 

Realme C31 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आला आहे. तिथे या फोनचा 3GBरॅम व 32GB मेमरी असलेला मॉडेल IDR 15,99,000 (जवळपास 8,500 रुपये) आणि 4GB रॅम व 64GB मेमरी मॉडेल IDR 17,99,000 (जवळपास 9,500 रुपये) मध्ये विकला जात आहे. भारतीय किंमत देखील याच्या आसपास असू शकते.  

टॅग्स :realmeरियलमीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड