शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत भारतात लाँच झाला Realme C25s; यात आहे 6000mAh ची मोठी बॅटरी 

By सिद्धेश जाधव | Updated: June 8, 2021 11:50 IST

Realme C25s Launch: Realme ने 6000mAh ची बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Realme C25s कोणताही गाजावाजा न करता भारतात लाँच केला आहे.  

Realme ने ‘सी’ सिरीजमध्ये Realme C20, Realme C21 आणि Realme C25 हे फोन्स लाँच केल्यानंतर आता भारतात Realme C25sस्मार्टफोन लाँच केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मलेशियात लाँच झालेला हा फोन भारतात मात्र कंपनीने कोणताही गाजावाजा न करता लाँच केला आहे. हा स्मार्टफोनरियलमी सी25 चा अपग्रेडेड व्हेरिएंट आहे. 

Realme C25s ची किंमत  

Realme C25s दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. या फोनचा 4 जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज भारतात 9,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. तर, 4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत कंपनीने 10,999 रुपये ठेवली आहे. फोन 9 जूनपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.   

Realme C25s ची डिजाईन  

Realme C25s वॉटरड्रॉप नॉच डिजाइनसह सादर केला गेला आहे. तसेच, फोनच्या मागे Geometric Art Design दिली आहे. मागील पॅनलवर वरच्या बाजूला डावीकडे चौरसाकृती कॅमेरा सेटअप आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे. उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर व पावर बटण तर डाव्या पॅनलवर सिम स्लॉट आहे. फोनच्या खालच्या पॅनलवर 3.5एमएम जॅकसह यूएसबी टाइप सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहे. 

Realme C25s चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स 

रियलमी सी25एस मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, फोन 4 जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम 128 जीबी स्टोरेजसह लाँच झाला आहे.  

रियलमी सी25एस मध्ये फोटोग्राफीसाठी मागील बाजूस क्वाड-कॅमेरा देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सल प्राइमरी, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक-अँड-वाइट कॅमेरा आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पावर देण्यासाठी 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी UI 2.0 स्किनसह येतो. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान