शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

स्वस्तात मस्त Realme C21Y भारतात लाँच; कमी किंमत मिळणार 5,000mAh बॅटरी आणि 4GB रॅम 

By सिद्धेश जाधव | Updated: August 23, 2021 14:41 IST

Realme C21Y India: Realme C21Y स्मार्टफोन आज भारतात लाँच करण्यात आला आहे. दोन व्हेरिएंटमध्ये सादर झालेल्या या स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

ठळक मुद्देRealme C21Y मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 8,999 रुपये आहे.या रियलमी स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 10 वर आधारित रियलमी युआय देण्यात आला आहे.

जुलैमध्ये व्हिएतनाममध्ये सादर झालेला बजेट Realme C21Y स्मार्टफोन आज भारतात लाँच करण्यात आला आहे. C सीरीजमध्ये आलेला हा नवीन एंट्री-लेवल स्मार्टफोन 30 ऑगस्टपासून विकत घेता येईल. दोन व्हेरिएंटमध्ये सादर झालेल्या या स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया स्वस्त Realme C21Y स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.  

Realme C21Y चे स्पेसिफिकेशन्स   

Realme C21Y मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1600 × 720 पिक्सल आहे आणि हा डिस्प्ले 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या रियलमी स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 10 वर आधारित रियलमी युआय देण्यात आला आहे. हा फोन Unisoc T610 चिपसेट आणि माली जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. हे देखील वाचा:  Narzo 40 सीरिज कुठे गेली? थेट Realme Narzo 50A 4G भारतीय वेबसाईटवर लिस्ट

फोटोग्राफीसाठी Realme C21Y मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. सिक्योरिटीसाठी या फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी Realme C21Y मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा:  Alert! हे 8 अ‍ॅप्स चुकूनही करू नका डाउनलोड; आणखीन 120 अ‍ॅप्स अजूनही अँड्रॉइडवर उपलब्ध

Realme C21Y ची किंमत 

रियलमी सी21वाय च्या 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 8,999 रुपये आहे. तर 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन 30 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडियावर खरेदीसाठी Blue आणि Black रंगात उपलब्ध होईल.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड