शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कोणताही गाजावाजा न करता भारतात Realme C11 (2021) लाँच; बघा या स्वस्त स्मार्टफोनची वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: June 25, 2021 19:42 IST

Realme C11 (2021) price: कंपनीने Realme C11 (2021) भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

ओप्पोचा सबब्रँड म्हणून Realme ने भारतात पदार्पण केले होते. आता स्वतंत्र ब्रँड म्हणून पण कंपनीने खूप चाहते मिळवले आहेत. कालच कंपनीने Realme Narzo 30 सिरीजमध्ये दोन स्मार्टफोन्स लाँच केले होते. कंपनीने या सीरिजमध्ये Narzo 30 4G आणि Narzo 30 5G असे दोन स्मार्टफोन्स लाँच केले होते. यासाठी कंपनीने एका ऑनलाईन इव्हेंटचे आयोजन केले होते. परंतु आज कंपनीने कोणताही सोहळा न करता चुपचाप आपला एक नवीन लो बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Realme C11 (2021) भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.  

Realme C11 (2021) ची किंमत Realme C11 (2021) भारतात 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज अशा एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Cool Blue आणि Cool Grey अशा दोन रंगात विकत घेता येईल. इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत कंपनी 200 रुपयांचा डिस्काउंट देत आहे, त्यामुळे या फोनची किंमत 6,799 रुपये होते. 

Realme C11 (2021) चे स्पेसिफिकेशन्स  Realme C11 (2021) मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1600x720 पिक्सल इतके आहे. या स्मार्टफोनमधील ऑक्टकोर प्रोसेसरचे नाव मात्र कंपनीने सांगितले नाही. 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह येणार स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 11 आधारित रियलमी यूआय गो एडिशन देण्यात आले आहे. या फोनची स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने वाढवता येईल.  

फोटोग्राफीसाठी Realme C11 (2021) मध्ये 8 मेगापिक्सलचा एक रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा 4x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Realme C11 (2021) मध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीच्या मदतीने इतर फोन्स देखील चार्ज करता येतात कारण यात रिवर्स चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.  

टॅग्स :realmeरियलमीAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन