शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पटापट संपतोय या मोबाईलचा स्टॉक; Realme च्या फाडू 5G स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सूट  

By सिद्धेश जाधव | Updated: March 31, 2022 18:37 IST

Realme 9 Pro Plus 5G स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हा 8GB रॅम, 50MP कॅमेरा आणि 60W फास्ट चार्जिंग असलेला फोन स्वस्तात विकत घेता येत आहे.

Realme 9 Pro Plus 5G स्मार्टफोन भारतात काही दिवसांपूर्वी लाँच झाला आहे. या फोनमध्ये 8GB रॅम, 50MP कॅमेरा आणि 60W फास्ट चार्जिंग असे दमदार फीचर्स मिळतात. आता हा फोन डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला आहे. तुम्ही या स्मार्टफोनच्या एका व्हेरिएंटवर 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळवू शकता.  

Realme 9 Pro+ 5G फोनच्या 8 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलवर 3 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. यासाठी तुम्हाला HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून हा फोन ऑर्डर करावा लागेल. जर तुमच्याकडे कार्ड नसेल तर तुम्ही पेटीएम वॉलेटनं पेमेंट करून 1 हजार रुपयाची बचत करू शकता.  या मॉडेलची मूळ किंमत 26,999 रुपये आहे. हा फोन Midnight Black, Aurora Green आणि Sunrise Blue कलरमध्ये विकत घेता येईल. 

Realme 9 Pro Plus चे स्पेसिफिकेशन्स  

रियलमी 9 प्रो प्लस स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. सोबत बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स कंपनीनं दिले आहेत. 

हा डिवाइस अँड्रॉइड 12 बेस्ड रियलमी युआय वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.5गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह MediaTek Dimensity 920 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी माली-जी68 एमसी4 जीपीयू मिळतो. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

फोटोग्राफीसाठी रियलमी 9 प्रो+ स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी Sony IMX766 सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 सेन्सर फ्रंटला देण्यात आला आहे.पावर बॅकअपसाठी रियलमी 9 प्रो+ मध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 60W SuperDart चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान