शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

स्मार्टवॉचवर पैसे खर्च करण्याची गरज नाही; Realme चा स्मार्टफोनच सांगणार युजरचा हार्ट रेट 

By सिद्धेश जाधव | Updated: February 2, 2022 11:58 IST

Realme 9 Pro+ Heart Rate Sensor: Realme 9 Pro+ स्मार्टफोन हार्ट रेट सेन्सरसह बाजारात येईल. हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो या फिचरसह बाजारात येईल.

Realme 9 Pro Series अंतर्गत भारतात लवकरच Realme 9 Pro आणि Realme 9 Pro+ हे दोन स्मार्टफोन कंपनी सादर करणार आहे. हे दोन्ही डिवाइस फेब्रुवारीमध्ये लाँच केले जाऊ शकतात. आता समोर आलेल्या नवीन बातमीनुसार, Realme 9 Pro+ फोनमध्ये हार्ट रेट सेन्सर देण्यात येईल. हा जगातील पहिला व्यावसायिक स्मार्टफोन असेल जो युजरच्या हृदयाची गती मोजेल, असा दावा कंपनीनं केला आहे. 

Realme 9 Pro+ Heart Rate Sensor 

रियलमीचे सीईओ माधव शेठ यांनी ट्विटरवरून या फिचरची माहिती दिली आहे. Realme 9 Pro+ स्मार्टफोनमध्ये हृदयाच्या ठोक्यांवर नजर ठेवणारा हार्ट रेट सेन्सर असेल. त्यांनी ट्वीट करून या फिचरचा एक डेमो व्हिडीओ देखील शेयर केला आहे. यासाठी हा स्मार्टफोन फोनमधील इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर करेल. तुम्ही हे ट्वीट पुढे बघू शकता.  

Realme 9 Pro+ ची लीक डिजाईन आणि स्पेक्स   

Realme 9 Pro+ या सीरीजमधील सर्वात प्रीमिमय स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये 6.43-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल, जो 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येईल. हा एक फ्लॅट डिस्प्ले आहे आणि खूप स्लिम बेझलसह सादर केला जाईल. आणि यात पंचहोल कटआऊट मिळू शकतो.   

रियलमीचा हा स्मार्टफोन Android 12 आधारित ColorOS 12 वर चालेल. हा फोन MediaTek Dimensity 920 SoC सह बाजारात येईल. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकतो शकते. पॉवर बॅकअपची जबाबदारी 4500mAh च्या बॅटरीवर असेल. या स्मार्टफोनमध्ये 50W फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.  

हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला जाईल. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सोबत 8MP अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. रियलमीच्या या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.  या मोबाईलचे ब्लॅक, अरोरा ग्रीन आणि सनराईज ब्लू कलर व्हेरिएंट बाजारात येऊ शकतात.   

हे देखील वाचा:

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान