शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटसअ‍ॅपवर क्युआर कोड स्कॅन करून होणार पैशांची देवाणघेवाण !

By शेखर पाटील | Updated: March 26, 2018 16:04 IST

व्हॉटसअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी क्युआर कोड स्कॅन करून पैशांची देवाण-घेवाण करण्याचे फिचर सादर केले आहे. 

मुंबई : व्हॉटसअ‍ॅपने काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या युपीआय या प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम भारतात नुकतीच सादर केली आहे. अजून ही सिस्टीम प्रयोगात्मक अवस्थेतच असतांना व्हॉटसअ‍ॅपवर आता क्युआर कोड स्कॅन करून देवाण-घेवाण करणारी पेमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. अर्थात ही सुविधा सध्या तरी व्हॉटसअ‍ॅपच्या बीटा आवृत्तीमध्ये देण्यात आलेली आहे. गुगल प्ले स्टोअरवरील बीटा प्रोग्रॅमसाठी नोंदणी केलेल्या युजर्सला ही सुविधा पहिल्यांदा वापरण्यासाठी मिळणार आहे. यासाठी संबंधीत युजरला सेटींग-पेमेंट-न्यू पेमेंट-स्कॅन क्युआर कोड या पर्यायाची निवड करावी लागणार आहे. यानंतर व्हाटसअ‍ॅपमधील क्युआर कोड स्कॅनर कार्यान्वित होईल. यात ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे त्याचा क्युआर कोड स्कॅन करावा लागेल. तसेच त्या युजरला किती पैसे पाठवायचे आहेत याच्या माहितीसह व्हेरिफिकेशनसाठी युपीआय पीन क्रमांक विचारण्यात येईल. यानंतर पैसे पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. व्हाटसअ‍ॅपच्या २.१८.९३ या ताज्या बीटा आवृत्तीच्या युजर्सला हे फिचर वापरण्यासाठी मिळाले आहे. अर्थात हे अजून प्रयोगात्मक अवस्थेत आहे. यात आवश्यक त्या सुधारणा होऊन येत्या कालखंडात याला सर्व युजर्ससाठी सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

व्हॉटसअ‍ॅपने याआधी क्युआर कोड स्कॅनिंगचा उपयोग करून संगणकावर आपल्या मॅसेंजर वापरण्याची सुविधा दिली आहे. यानंतर आता याच प्रणालीचा वापर पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी होणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. भारतात पेटीएमसारख्या पेमेंट सिस्टीम्समध्ये क्युआर कोड स्कॅनींगचा अतिशय अचूक आणि सुरक्षित वापर केला जात आहे. व्हाटसअ‍ॅपही याच मार्गावरून जाणार असल्याचेही यातून अधोरेखित झाले आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप