शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

PUBG New State भारतात लाँच; Google Play Store वरून अशाप्रकारे करा डाउनलोड  

By सिद्धेश जाधव | Updated: November 11, 2021 11:42 IST

PUBG New State India Release: गेम डेव्हलपर Krafton ने PUBG New State हा नवीन गेम लाँच केला आहे. हा Battle Royale Game अँड्रॉइड स्मार्टफोनवर Google Play Store वरून डाउनलोड करता येईल.  

ठरल्याप्रमाणे PUBG New State आज 11 नोव्हेंबरला लाँच झाला आहे. हा गेम भारतासह जगभरात लाँच करण्यात आला आहे. अँड्रॉइड युजर्स हा यह गेम Google Play Store वरून सहज डाउनलोड करू शकतात. या गेमची खासियत म्हणजे यातील नवीन ग्राफिक्स आणि अ‍ॅडव्हान्स व्हेईकल तसेच वेपन्स, असे गेम डेव्हलपर Krafton ने सांगितले आहे.  

PUBG New State  

PUBG New State यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्री-रेजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध झाला होता. लाँच होण्याआधीच 40 मिलियन लोकांनी या गेमसाठी नोंदणी केली होती. त्या युजर्सना गेम रिलीज झाल्यावर नोटिफिकेशन द्वारे उपलब्धतेची माहिती देण्यात आली आहे. यात Android आणि iOS दोन्ही युजर्सचा समावेश आहे. गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन करणाऱ्या प्लेयर्सना मोफत स्किन देण्यात येईल. 

भारतीय BGMI आणि ग्लोबल व्हर्जन PUBG Mobile प्रमाणेच हा देखील एक Battle Royale Game आहे. जो कुणीही मोफत डाउनलोड करू शकतो. नवीन ग्राफिक्समुळे या गेमचा आकार 1.44GB आहे.यात Troi, Erangel 2051, 4v4 TDM आणि Training असे चार गेमिंग मोड मिळतात.  

PUBG New State मध्ये कारच्या ट्रंकमध्ये वेपन्स साठवून ठेवण्याचा पर्याय देण्यात येईल. जो याआधीच्या PUBG गेममध्ये मिळत नव्हता. प्लेयर्स गेममधील परिस्थितीनुसार वेपन्स बदलू शकतील. तसेच मेलेल्या गेमर्सच्या कारची ट्रंक लुटू देखील शकतील.  

How to Download New PUBG State? 

  • सर्वप्रथम Google Play Store ओपन करा. 
  • सर्च बार मध्ये PUBG New State असा सर्च करा. 
  • गेमच्या नावासमोर असलेल्या Install बटनवर क्लिक करा. 
  • गेम डाउनलोड होऊन इंस्टॉल होईल. त्यानंतर तुम्ही साइन इन करून गेम खेळू शकाल. 
  • तसेच iPhone मध्ये Apple App Store वर देखील हा गेम डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.  
टॅग्स :PUBG Gameपबजी गेमtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड