शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पबजी पुन्हा येणार! भारतासाठी खास गेम असणार; कंपनीकडून मोठी घोषणा

By कुणाल गवाणकर | Published: November 12, 2020 4:36 PM

लवकरच पबजी नव्या रुपात भारतात परतणार; कंपनीची माहिती

मुंबई: पबजी मोबाईल (PUBG Mobile) भारतात परत येणार आहे. दक्षिण कोरियन कंपनी पबजी कॉर्पोरेशननं याबद्दलची घोषणा केली आहे. भारतीय बाजाराचा विचार करून नवा गेम घेऊन येत असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. भारतात पुन्हा येणाऱ्या पबजीमध्ये चिनी कंपनीची कोणतीही भागिदारी नसेल, हेदेखील कंपनीनं स्पष्ट केलं आहे.भारतात पबजी मोबाईल इंडिया लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती पबजी कॉर्पोरेशननं दिली. नवं ऍप डेटा सुरक्षेच्या नियमांचं अधिक काटेकोरपणे पालन करेल. याशिवाय भारतात मोठी गुंतवणूक करण्यास सज्ज असल्याची माहितीदेखील कंपनीकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात पबजी कॉर्पोरेशननं माध्यमांना अधिकृतपणे महत्त्वाची माहिती दिली आहे. 'प्लेअर्स अननोन बॅटलग्राऊंडची (पबजी) निर्माती असलेली पबजी कॉर्पोरेशन भारतात पबजी मोबाईल इंडिया लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची घोषणा करत आहे,' असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.PUBG Mobile पुन्हा भारतात येणार? एका पोस्टमुळे चर्चेला उधाणपबजी कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार पबजी मोबाईल इंडियाची निर्मिती खास भारतासाठी करण्यात आली आहे. या माध्यमातून वापरकर्त्यांना अधिक सुरक्षा मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. वापरकर्त्यांसोबत अधिक उत्तम पद्धतीनं संवाद साधला जावा यासाठी कंपनी भारतात एक सबसिडरी तयार करेल. त्यासाठी भारतातील पबजी कंपनी १०० जणांची टीम तयार करेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

पबजी कॉर्पोरेशनची मालकी असलेली क्राफ्टॉन भारतात १०० मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. लोकल गेम्स, ई-स्पोर्ट्स, मनोरंजन आणि आयटी उद्योगात कंपनी प्रामुख्यानं गुंतवणूक करेल, असं कंपनीनं सांगितलं आहे. दक्षिण कोरियन कंपनीकडून करण्यात येणारी ही भारतातील सर्वात मोठी गुंतवणूक असेल, असा कंपनीचा दावा आहे.वापरकर्त्यांच्या सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन मोदी सरकारनं पबजीवर बंदी घातली. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळेच पुन्हा भारतात येताना क्राफ्टॉननं चिनी कंपनी टेन्सेंटची मदत घेतलेली नाही. मात्र इतर देशांमध्ये क्राफ्टॉन टेन्सेंटसोबत काम करत राहणार आहे.

टॅग्स :PUBG Gameपबजी गेम