युजर्सच्या प्रायव्हसी आणि सुरक्षेबाबत नेहमीच आग्रही असणाऱ्या अॅपल कंपनीने आता त्यांच्या चाहत्यांना एक मोठा धक्का दिला आहे. विश्वास बसणार नाही, पण आता तुमचा लाडका आयफोनदेखील तुमचं लोकेशन ट्रॅक करत असल्याचं उघड झालं आहे. 'iOS 26' हे अपडेट आल्यानंतर अॅपल मॅप्समध्ये ‘Visited Places’ नावाचे एक नवीन फीचर समाविष्ट करण्यात आले आहे. हे फीचर बाय डिफॉल्ट ऑन असते आणि तुम्ही भेट दिलेल्या प्रत्येक ठिकाणाचा रेकॉर्ड ठेवून तुम्हाला ट्रॅक करत राहते. जर तुम्हाला तुमची प्रायव्हसी महत्त्वाची वाटत असेल आणि अॅपलने तुमचा प्रवास ट्रॅक करणे पसंत नसेल, तर लगेच ही सेटिंग बंद करणे आवश्यक आहे.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन असूनही चिंता कायम!
अॅपलने युजर्सना आश्वासन दिले आहे की, ‘Visited Places’ लिस्ट एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड आहे. म्हणजे हा डेटा केवळ तुमच्या डिव्हाइसवर सुरक्षित राहतो. मात्र, तरीही कंपनी तुमच्या प्रत्येक प्रवासाच्या ठिकाणांचा रेकॉर्ड ठेवत असल्यामुळे अनेक युजर्समध्ये प्रायव्हसीबाबत चिंता वाढली आहे. तुम्हालाही जर तुमच्या ‘लोकेशन ट्रॅकिंग’ची चिंता वाटत असेल, तर खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे फीचर बंद करू शकता आणि जुनी हिस्ट्रीदेखील डिलीट करू शकता.
आयफोन युजर्सनी विजिटेड प्लेस फीचर 'असे' बंद करा!
या सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि अॅपलला तुमचं ट्रॅकिंग थांबवायला सांगा:
> तुमच्या आयफोनमधील ‘Settings App’ उघडा.
> ‘Apps’ पर्यायावर टॅप करा आणि त्यामधून ‘Maps’ हा पर्याय निवडा.
> आता ‘Location’ या सेटिंगमध्ये जा.
> स्क्रीनवर खाली स्क्रोल करा आणि ‘Visited Places’ हे फीचर बंद करा.
> हे फीचर बंद केल्यानंतर Apple Maps तुमच्या भविष्यातील भेटीच्या ठिकाणांना ट्रॅक करणार नाही.
> Visited Placesची जुनी हिस्ट्री डिलीट करण्याची पद्धत
जर तुम्हाला तुमची जुनी ट्रॅकिंग हिस्ट्री देखील फोनमधून काढून टाकायची असेल, तर खालीलप्रमाणे कृती करा:
> ‘Apple Maps App’ उघडा.
> त्यानंतर ‘Places’ वर टॅप करा आणि ‘Visited Places’ मध्ये जा.
> खाली स्क्रोल करून ‘Clear History’ यावर टॅप करा.
> पुष्टी करण्यासाठी ‘Clear All’वर टॅप करा.
हिस्ट्री डिलीट केल्याने तुमचा जुना साठवलेला लोकेशन डेटा आयफोनमधून काढून टाकला जातो. यामुळे तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहते आणि अॅपल तुमच्या जुन्या ठिकाणांचा मागोवा घेऊ शकत नाही.
Web Summary : Apple Maps secretly tracks users' locations via 'Visited Places' feature after iOS 26 update. Disable the setting in iPhone's Maps settings to prevent tracking and clear history for enhanced privacy.
Web Summary : iOS 26 अपडेट के बाद एप्पल मैप्स 'विजिटेड प्लेसेस' फीचर के माध्यम से उपयोगकर्ताओं के स्थानों को ट्रैक करता है। ट्रैकिंग रोकने और गोपनीयता बढ़ाने के लिए iPhone की मैप सेटिंग में जाकर इसे बंद करें।