शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Galaxy S21 चं भारतात प्री-बुकिंग सुरू; ग्राहकांना मिळणार 'ही' ऑफर

By जयदीप दाभोळकर | Updated: January 8, 2021 13:12 IST

प्री-बुक केल्यास ग्राहकांना व्हीआयपी पाससह मिळणार एक ऑफर

ठळक मुद्देग्राहकांना २ हजार रूपये भरून स्मार्टफोन प्री-बुक करता येणारसॅमसंग इंडिया ई-स्टोअर आणि सॅमसंग शॉप अॅपद्वारे स्मार्टफोन बुक करण्याची संधी

दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगनं भारतात आपल्या नव्या Galaxy फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी नोंदणी करण्यास सुरूवात केली आहे. सॅमसंगनं दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना २ हजार रूपये भरून त्यांचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन बुक करता येणार आहे. आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन ग्राहकांना सॅमसंग इंडिया ई-स्टोअर आणि सॅमसंग शॉप अॅपद्वारे बुक करता येणार आहे. प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना कंपनी  Next Galaxy VIP Pass देणार आहे. फोन खरेदी करताना प्री बुक करते वेळी देण्यात आलेलेल २ हजार रूपयेदेखील वजा करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त जे ग्राहक Galaxy फ्लॅगशिप म्हणजे Galaxy S21 प्री बुक करतील त्यांना ३,८४९ रूपये किंमतीचं एक कव्हर मोफत दिलं जाणार आहे. सॅमसंगनं दिलेल्या माहितीनुसार Galaxy फ्लॅगशिपसाठी प्री बुकिंग १४ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. सॅमसंग आपला पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात कंपनीनं काही टिझरही जारी केले आहेत. Galaxy S21 चे काही फोटो आणि स्पेसिफिकेशन्सही लीक झाले होते. यावरून ग्राहकांना या फोनमध्ये काय खास असेल याची कल्पना आली आहे. 

Galaxy S21च्या डिझाईनमध्येही Galaxy S20 च्या तुलनेत बदल पाहायला मिळणार आहे. विषेशत: Galaxy S21 सीरिजचं कॅमेरा मॉड्यूल हे वेगळं असणार आहे. तसंच यावेळी मोबाईलमध्ये काही नवे सेन्सर्सही पाहायला मिळतील. प्रोसेसरबाबत सांगायचं झाल्यास Galaxy S21 सीरिजमध्ये Qualcomm Snapdragon 888 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. परंतु कंपनी भारतातील आपल्या फ्लॅगशिप फोनमध्ये इनहाऊस  Exynos प्रोसेसर देते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलsamsungसॅमसंगonlineऑनलाइन