शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पोरट्रॉनिक्सचा नेकबँड इयरफोन दाखल

By शेखर पाटील | Updated: August 8, 2018 13:08 IST

पोरट्रॉनिक्स कंपनीने भारतीय बाजारपेठेत हार्मोनिक्स २०० हा नेकबँड इयरफोन उतारण्याची घोषणा केली आहे.

पोरट्रॉनिक्स कंपनीने भारतीय बाजारपेठेत हार्मोनिक्स २०० हा नेकबँड इयरफोन उतारण्याची घोषणा केली आहे. अलीकडच्या काळात नेकबँड या प्रकारातील इयरफोन्सचे मॉडेल लोकप्रिय होऊ लागले आहेत. यात स्टाईट आणि युटिलीटी या दोन्ही घटकांचा मिलाफ असल्यामुळे ग्राहकांची याला पसंती मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर पोरट्रॉनिक्स या भारतीय कंपनीने आपले हार्मोनिक्स २०० हे मॉडेलदेखील याच प्रकारात उपलब्ध केले आहे. याचे मूल्य २,९९० रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहे. 

इयरफोन्सला नेकबँड संलग्न करण्यात आलेला आहे. हा नेकबँड अतिशय आकर्षक रंगाचा आणि स्टायलीश लूक असणारा आहे. यामध्ये सीएसआर ही चीपसेट देण्यात आलेली आहे. तर यामध्ये सीव्हीसी बॅकग्राऊंड नॉइस रिडक्शन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे युजरला बाहेरच्या आवाजाचा फारसा त्रास होत नसल्याचे कंपनीने नमूद केले आहे. अर्थात यामुळे अतिशय स्पष्ट ध्वनीचा आनंद घेता येतो.

हार्मोनिक्स २०० या मॉडेलमध्ये ब्ल्यु-टुथ ४.१ कनेक्टीव्हिटीचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. याच्या मदतीने हे मॉडेल स्मार्टफोनसह अन्य उपकरणांना कनेक्ट करता येते. सुमारे १० मीटर अंतरापर्यंत याची रेंज असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींचा सपोर्ट प्रदान करण्यात आलेला आहे. याच्याशी संलग्न असणार्‍या स्मार्टफोनवरील कॉल यावर ऐकता येतात. तसेच यावरून कॉल करण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. याला इन-लाईन कंट्रोल प्रणाली दिलेली आहे. याच्या मदतीने म्युझिक ट्रॅकला पुढे-मागे व पॉज करण्यासह ध्वनी कमी-जास्त करण्याची सुविधा यामुळे ग्राहकांना मिळाली आहे.

अतिशय दर्जेदार बॅटरी देण्यात आलेली आहे. ती एकदा चार्ज केल्यानंतर १८ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर एकदा चार्ज केल्यानंतर ही बॅटरी तब्बल ३०० दिवसांचा स्टँडबाय टाईम देत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.  या इयरफोन्सवर हायड्रोफोबीक नॅनो कोटींग दिलेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे मॉडेल आयपीएक्स५ या निकषानुसार उत्पादीत करण्यात आले आहे. यामुळे यावर घामाचा कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान