शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

हा स्वस्त स्पीकर वाढवेल तुमच्या रोड ट्रिपची शान; पाणी पडल्यावर देखील दमदार आवाज 

By सिद्धेश जाधव | Updated: June 17, 2022 16:00 IST

boAt Stone 135 नावाचा ब्लूटूथ स्पिकर कंपनीनं भारतात सादर केला आहे.  

boAtचे  ब्लूटूथ स्पिकर भारतात खूप लोकप्रिय आहेत. कमी किंमतीत दमदार आवाज आणि शानदार फीचर्समुळे भारतीय या ब्रँडला पसंती देतात. आता कंपनीनं आपल्या ब्लूटूथ स्पिकरच्या पोर्टफोलियोमध्ये नव्या डिवाइसची भर टाकली आहे. boAt Stone 135 नावाचा नवा पोर्टेबल ब्लूटूथ स्पिकर लाँच झाला आहे. चला जाणून घेऊया याची किंमत आणि फीचर्स.  

boAt Stone 135 ची किंमत  

boAt Stone 135 ची किंमत 799 रुपये ठेवण्यात आली आहे. या किफायतशीर किंमतीत तुम्ही ब्लॅक, बोल्ड ब्लू, सोल्जर ग्रीन आणि स्पेस ग्रे कलर व्हेरिएंटची निवड करू शकता. कंपनीच्या लाईफस्टाईल स्टोरसह boAt Stone 135 ची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India वरून देखील केली जाईल.  

boAt Stone 135 चे स्पेसिफिकेशन  

boAt Stone 135 एक 5W पोर्टेबल स्पिकर आहे, ज्यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 टेक्नॉलॉजी मिळते. या स्पीकरची रेंज 10 मीटर पर्यंत आहे. स्पिकरला IPX4 सर्टिफिकेट मिळालं आहे, जे वॉटर रेजिस्टन्स क्षमता दर्शवतं. हा पोर्टेबल स्पिकर 80% वॉल्यूमवर 11 तासांपर्यंतचा प्लेटाइम देऊ शकतो. बॅटरी चार्ज करण्यासाठी मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

या पोर्टेबल स्पिकरमध्ये एक TF कार्ड स्लॉट देण्यात आला आहे, ज्याचा वापर करून युजर्स मायक्रोएसडी कार्डवरील संगीत थेट ऐकू शकतात. तसेच FM रेडियो देखील या स्पिकरच्या माध्यमातून ऐकता येईल.  boAt Stone 135 मध्ये TWS सपोर्ट देखील देण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या स्पिकरशी हा कनेक्ट करता येतो, म्हणजे जास्त स्पष्ट आणि मोठा आवाज मिळेल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान