शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

आणखीन काय हवं? जगातील सर्वात मोठा कॅमेरा, मोठी बॅटरी आणि 5G सह ‘या’ दिवशी येतोय नवा Poco फोन  

By सिद्धेश जाधव | Updated: March 22, 2022 12:30 IST

Poco X4 Pro 5G च्या जागतिक लाँचनंतर आता भारतीय लाँचची तयारी कंपनीनं सुरु केली आहे. हा फोन 5000mAh बॅटरी, 108MP कॅमेरा, 8GB RAM आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह देशात येईल.  

Poco X4 Pro 5G लवकरच भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. कंपनीनं अधिकृत ट्विटर हँडलच्या माध्यमातून या फोनच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी MWC 2022 च्या माध्यमातून या डिवाइसची जागतिक बाजारात एंट्री झाली होती. हा फोन 5000mAh बॅटरी, 108MP कॅमेरा, 8GB RAM आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह देशात येईल.  

Poco India नं आपल्या ट्विटर हँडलवरून Poco X4 Pro 5G चा पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टरमधून अचूक अशी लाँच डेट समोर आली नाही परंतु पोस्टरमध्ये रोमन अंक X आणि IV दिसत आहेत. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की हा फोन भारतात 10 एप्रिलला लाँच केला जाईल. जागतिक बाजारातील मॉडेल आणि भारतीय व्हेरिएंटमध्ये फरक असण्याची शक्यता देखील मीडिया रिपोर्ट्समधून वर्तवण्यात आली आहे.  

Poco X4 Pro 5G चे स्पेसिफिकेशन 

फोनमध्ये कंपनीनं 6.67 इंचाच्या फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेचा वापर केला आहे. हा डिप्सले 1200 निट्स की पीक ब्राईटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये अँड्रॉइड 11 आधारित MIUI 13 देण्यात आला आहे. प्रोसेसरसाठी यात स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. पोकोच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते.

फोटोग्राफीसाठी Poco X4 Pro 5G मध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या पोको फोनमधील 5000mAh ची बॅटरी 67 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

टॅग्स :MobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान