शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

स्वस्त 5G Phone च्या यादीत होऊ शकतो POCO M4 Pro चा समावेश; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक 

By सिद्धेश जाधव | Updated: October 4, 2021 13:00 IST

Budget 5G Phone Poco M4 Pro launch: POCO M4 Pro 5G स्मार्टफोन लवकरच सर्वप्रथम भारतात सादर केला जाऊ शकतो. हा एक मिड बजेट 5G Phone असू शकतो.

पोकोने गेल्या आठवड्यात आपला लो बजेट स्मार्टफोन POCO C31 लाँच केला आहे. हा फोन बजेट सेगमेंटमध्ये सादर झालेला 4G फोन आहे. कंपनी लवकरच आपला आगामी 5G फोन कमी किंमतीत सादर करू शकते. आता आलेल्या ताज्या लिक्सनुसार कंपनी POCO M4 Pro 5G या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो लवकरच बाजारात दाखल होऊ शकतो.  

POCO M4 Pro 5G फोनची माहिती टिपस्टर अभिषेक यादवने दिली आहे. लिक्सटरनुसार हा फोन  EEC, 3C, IMEI आणि TENAA सारख्या सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून पोको एम4 प्रो ट्रेडमार्क आणि 21091116AG या मॉडेल नंबरची माहिती मिळाली आहे. हा फोन सर्वप्रथम भारतात सादर केला जाईल, अशी चर्चा आहे. परंतु कंपनीने या फोनची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.  

नुकत्याच लाँच झालेल्या POCO C31 चे स्पेसिफिकेशन्स  

पोको सी31 मध्ये 20:9 अस्पेक्ट रेशियो, 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक 6.53 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. पाण्यापासून वाचण्यासाठी या फोनवर पी2आई नॅनोकोटिंग देण्यात आली आहे. हा अँड्रॉइड 10 ओएसवर लाँच केला गेला आहे जो मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी यात पॉवरवीआर जीई8320 जीपीयू देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये 4GB पर्यंतचा RAM आणि 64GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते.   

फोटोग्राफीसाठी पोको सी31 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स मिळते. हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी पोको सी31 मध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड