शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भारतात येणार शानदार POCO F3 GT; ऑगस्टमध्ये होऊ शकतो लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: July 7, 2021 12:05 IST

POCO F3 GT India Launch: POCO F3 GT च्या भारतीय लाँचची नेमकी तारीख समोर आली नाही परंतु हा स्मार्टफोन ऑगस्टच्या सुरुवातीला लाँच केला जाण्याची शक्यता आहे.  

पोको इंडिया लवकरच भारतात POCO F3 GT स्मार्टफोन लाँच करू शकते. काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन BIS सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाला होता. तेव्हा हा स्मार्टफोन तिसऱ्या तिमाहीत भारतात सादर केला जाईल अशी बातमी आली होती. परंतु आता 91mobiles आणि टिपस्टर योगेश यांनी दिलेल्या माहितीनुसार POCO F3 GT स्मार्टफोन भारतात ऑगस्टमध्ये लाँच केला जाऊ शकतो. अजूनतरी POCO F3 GT च्या भारतीय लाँचची नेमकी तारीख समोर आली नाही परंतु हा स्मार्टफोन ऑगस्टच्या सुरुवातीला लाँच केला जाण्याची शक्यता आहे.  

POCO F3 GT चे स्पेसिफिकेशन्स 

ग्लोबल मार्केटमध्ये POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाच्या फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC देण्यात आली आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या पोको स्मार्टफोनमध्ये Android 11 वर आधारित MIUI 12 देण्यात आला आहे.

 

POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा मुख्य कॅमेरा 64MP चा सेन्सर आहे, त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा सेंसर आणि 2MP चे सेंसर मॅक्रो आणि डेप्थ सेंसर असू शकतात. POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये 5,065mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. पोकोच्या या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स Redmi K40 Gaming Edition सारखे आहेत. 

POCO F3 GT ची भारतातील किंमत 

Redmi K40 Gaming Edition च्या किंमतीवरून POCO F3 GT च्या भारतीय किंमतीचा कयास लावता येईल. हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. या फोनचा बेस व्हेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 1,999 RMB (सुमारे 23,000 रुपये) मध्ये लाँच केला जाऊ शकतो. तसेच 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 2,199 RMB (सुमारे 25,300 रुपये) आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 2,699 RMB (सुमारे 31,000 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान