शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

पावरफुल गेमिंग फीचर्स आणि अनोख्या डिजाईनसह धमाकेदार POCO F3 GT लाँच; देणार का वनप्लस नॉर्डला टक्कर? 

By सिद्धेश जाधव | Updated: July 23, 2021 14:45 IST

POCO F3 GT India Price: भारतात Poco F3 GT स्मार्टफोन 3 व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

पोकोने भारतात आपला गेमिंग स्मार्टफोन Poco F3 GT 5G आज लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा फ्लॅगशिप डायमेंसिटी 1200 प्रोसेसर मिळतो. तसेच अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह भारतात येणारा हा कंपनीचा पहिलाच  स्मार्टफोन आहे. चला जाणून घेऊया POCO F3 GT ची किंमत आणि भन्नाट स्पेसिफिकेशन्स.  (POCO F3 GT launched in India with dimensity 1200 SoC at Rs 2699)

POCO F3 GT चे स्पेसिफिकेशन्स  

POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 480Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या पोको स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच गेम खेळताना फोन गरम होऊ नये म्हणून यात कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 256 पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.  

POCO F3 GT मध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या चारही बाजूला असलेली अ‍ॅम्बिएन्ट लाईट नोटिफिकेशन इंडिकेटरचे काम करते. तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 

पोकोच्या या गेमिंग फोनमध्ये 5,065mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फक्त 15 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. फोनच्या बॉक्समध्ये 67W चार्जर आणि एक एल-शेप चार्जिंग केबल देण्यात आली आहे.  

POCO F3 GT ची किंमत  

भारतात Poco F3 GT स्मार्टफोन 3 व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मॉडेल 28,999 रुपये आणि 8GB रॅम व 256GB मॉडेल 30,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा 24 जुलैला दुपारी 12 वाजता प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल आणि 26 जुलै दुपारी 12 वाजल्यापासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. POCO F3 GT स्मार्टफोन फ्लिपकार्टवर प्रीडेटर ब्लॅक आणि गनमेटल सिल्वर रंगात उपलब्ध होईल.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडFlipkartफ्लिपकार्ट