शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

Paytm वर आता COVID Vaccine slotsची माहिती, मिळणार इंस्टंट अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 15:53 IST

covid vaccine slot finder tool : पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे की पेटीएमवर युजर्स आपल्या भागात लसीकरणसाठी नवीन स्लॉट उपलब्ध झाल्यास अलर्ट मिळवू शकतील.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट अ‍ॅप पेटीएमने कोविड लस स्लॉट सर्च करण्यासाठी नवीन टूल Paytm Vaccine Slot Finder लाँच करण्याची घोषणा केली आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे की पेटीएमवर युजर्स आपल्या भागात लसीकरणसाठी नवीन स्लॉट उपलब्ध झाल्यास अलर्ट मिळवू शकतील. (Paytm launches new covid vaccine slot finder tool for instant alert and new vaccination slot)

विजय शेखर शर्मा यांनी गुरुवारी ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, कंपनी कोविड लस स्लॉटसाठी एक नवीन टूल लाँच करत आहे, ज्यामुळे युजर्स स्लॉट पाहू शकतील. तसेच, या टूलच्या माध्यमातून युजर्संना त्यांच्या भागात नवीन स्लॉट उपलब्ध झाल्यास अलर्ट मिळेल. याशिवाय, नवीन स्लॉट ओपन झाल्यास Paytm Chat च्या माध्यमातून रिअल टाईम उपलब्धता आणि अलर्ट सुद्धा युजर्सला मिळेल.

कंपनी रिअल-टाइममध्ये देशभरात उपलब्ध लस स्लॉटला ट्रॅक करत आहे. Paytm Vaccine Slot Finder द्वारे युजर्स नवीन लस स्लॉट ओपन झाल्यानंतर स्लॉट बुक करू शकतात आणि इंस्टंट अलर्ट मिळवू शकतात, असे पेटीएमचे म्हणणे आहे. दरम्यान, देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच लसीकरण मोहिमेवर सरकारने अधिक भर दिला आहे. १ मे पासून देशभरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले आहे. मात्र, अनेक लसीकरण केंद्रावर लसीचा साठा उपलब्ध नसल्याने पाहायला मिळत आहे.

रशिया भारताला देणार Sputnic-V चे आणखी दीड लाख डोस

सध्या भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडताना दिसत आहे. दरम्यान, अनेक देशांनी भारताकडे मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, यापूर्वी भारताचा जुना मित्र समजल्या जाणाऱ्या रशियानंही भारताला मोठ्या प्रमाणात मदत केली होती. तसंच Sputnik-V या लसीचे काही डोस पाठवले होते. आता पुन्हा एकदा रशिया पुढील दोन दिवसांमध्ये Sputnik-V या लसीच्या दीड लाख डोसची दुसरी खेप पाठवणार आहे. याव्यतिरिक्त मे महिन्याच्या अखेरिस हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबमध्ये तीस लाख डोस येणार आहे. सध्या जून महिन्यापर्यंत ५० लाख आणि जुलै महिन्यापर्यंत Sputnik-V चे एक कोटी डोस भारतात पाठवण्याची तयारी रशियाकडून सुरू आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPaytmपे-टीएमcorona virusकोरोना वायरस बातम्या