शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

पासपोर्ट अर्ज प्रक्रियेसाठी नवा नियम, आता DigiLocker वर अपलोड करावे लागतील डॉक्युमेंट, जाणून घ्या, कसे वापरायचे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 20:48 IST

कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर अर्जदार www.passportindia.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले पासपोर्ट अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतील.

नवी दिल्ली : आजपासून म्हणजेच 5 ऑगस्टपासून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्ट अर्ज प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे . आता नवीन पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी प्रवाशांना डिजीलॉकर वापरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. डिजीलॉकर हा सरकारी प्लॅटफॉर्म आहे. 

कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर अर्जदार www.passportindia.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले पासपोर्ट अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतील. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितले की, जर अर्जदारांनी आपली कागदपत्रे डिजीलॉकरद्वारे अपलोड केली असतील तर त्यांना अर्ज प्रक्रियेदरम्यान ओरिजनल फिजिकल कॉपी आणण्याची आवश्यकता नाही. या निर्णयामुळे पासपोर्ट अर्ज प्रक्रियेचा वेळ आणि कार्यक्षमता सुधारेल अशी अपेक्षा आहे.

काय आहे DigiLocker?डिजीलॉकर हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे प्रदान केलेली डिजिटल वॉलेट सेवा आहे. यामध्ये युजर्स ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि मार्कशीट सारखी सरकारी कागदपत्रे सुरक्षितपणे स्टोअर आणि अॅक्सेस करू शकतात. मंत्रालयाने आता ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यासाठी डिजीलॉकरद्वारे आधार कागदपत्रांचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.

युजर्स डिजीलॉकरमध्ये शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्म प्रमाणपत्रे, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट आणि मतदार ओळखपत्र यासारखी महत्त्वाची अधिकृत कागदपत्रे देखील स्टोअर करू शकतात आणि अॅक्सेस करू शकतात. हा बदल अर्ज प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि विविध क्षेत्रांमधील पासपोर्ट सेवा केंद्र (PSKs) आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (POPSKs) येथे फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची गरज कमी करण्यासाठी लागू करण्यात आला आहे.

डिजीलॉकर वापरण्याचा निर्णय PSKs वर फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनदरम्यान आढळलेल्या त्रुटींमुळे घेण्यात आला आहे. जसे की चुकीची जन्मतारीख आणि वैयक्तिक माहिती. डिजीलॉकर लागू करून, सादर केलेल्या कागदपत्रांची अचूकता आणि सत्यता सुनिश्चित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

DigiLocker चा वापर कसा करायचा?डिजीलॉकर खाते उघडण्यासाठी, वापरकर्त्यांना एक मोबाइल नंबर द्यावा लागेल जो आधीपासून आधारशी लिंक आहे. DigiLocker खात्याची नोंदणी करताना, वापरकर्त्यांना लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP प्राप्त होईल. वापरकर्त्यांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर करावा लागेल. DigiLocker खाते नाव अपडेट किंवा मोबाइल नंबर अपडेट यासारखे कोणतेही बदल करण्यासाठी, वापरकर्त्यांनी प्रथम तो डेटा आधारमध्ये अपडेट करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :passportपासपोर्टtechnologyतंत्रज्ञान