पॅनासोनिक कंपनीने एल्युगा आय ९ हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर केले असून, हा स्मार्टफोन ग्राहकांना उद्यापासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. पॅनासोनिक एल्युगा आय ९ हा स्मार्टफोन ग्राहकांना स्पेस ग्रे, शँपेन गोल्ड आणि ब्ल्यू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ७,४९९ रुपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे. यातील विशेष फिचर म्हणजे यात पॅनासोनिक कंपनीने विकसित केलेला अर्बो हा व्हर्च्युअल डिजिटल असिस्टंट देण्यात आला आहे. याच्या मदतीने व्हाईस कमांडचा उपयोग करून विविध फिचर्सचा वापर करता येईल.पॅनासोनिक एल्युगा आय ९ या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी (७२० बाय १२८० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले आहे. यात क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी६७३७ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ३ जीबी आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. पॅनासोनिक एल्युगा आय ९ या स्मार्टफोनमधील मुख्य कॅमेरा १३ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. यातील दोन्ही कॅमेर्यांमध्ये एलईडी फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे. तर यातील कॅमेर्यात वॉटरमार्क, पॅनोरामा, बर्स्ट मोड आदींसह विविध फिल्टर्स प्रदान करण्यात आले आहेत.पॅनासोनिक एल्युगा आय ९ स्मार्टफोनमधील बॅटरी २,५०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणार, असून यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो-युएसबी, युएसबी-ओटीजी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स असतील.
फ्लिपकार्टवरून मिळणार पॅनासोनिक एल्युगा आय ९
By शेखर पाटील | Updated: December 14, 2017 16:18 IST