शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

लाँचपूर्वीच जाणून घ्या OPPO Reno 6 Pro ची किंमत; ओप्पो फोनचा रिटेल बॉक्स लीक 

By सिद्धेश जाधव | Updated: July 12, 2021 13:09 IST

Oppo Reno6 Pro Price: टिप्सटरने Oppo Reno 6 Pro च्या किंमतीची माहिती दिली आहे. दोन टिप्सटरनी एकच किंमत लीक केली आहे.

Oppo ची फ्लॅगशिप Oppo Reno 6 सीरिज लवकरच भारतीयांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज Flipkart च्या माध्यमातून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro भारतात 14 जुलैला लाँच होणार आहेत. हे फ्लॅगशिप स्मार्टफोन दुपारी 3 वाजता ऑनलाइन इव्हेंटमधून सादर केले जातील. लाँच होण्यापूर्वी या सीरीजची बरीचशी माहिती उघड झाली आहे. आता OPPO Reno 6 Pro ची किंमत लीक झाली आहे.  

OPPO Reno 6 Pro ची लीक किंमत 

टिप्सटर देब्यान रॉयने Oppo Reno 6 Pro च्या किंमतीची माहिती दिली आहे. Oppo Reno6 Pro च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतात 46,990 रुपये असू शकते, असे टिप्सटर सांगितले आहे. या व्हेरिएंटची इंट्रोडक्टरी किंमत फक्त 42,990 रुपये असू शकते, असे देखील सांगण्यात आले आहे. तसेच या स्मार्टफोनचा छोटा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 38,990 रुपये किंवा 39,990 रुपयांमध्ये विकला जाऊ शकतो.  

त्याचबरोबर टिपस्टर रॉक लीकने देखील ओप्पोच्या या स्मार्टफोनची किंमत शेयर केली आहे. त्याने रिटेल बॉक्सचा एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे, या स्क्रीनशॉटवरून ओप्पोच्या या फोनच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. या फोटोमध्ये ओप्पोच्या या फोनची किंमत 46,990 रुपये आहे. दोन्ही टिप्सटरच्या किंमती सारख्याच असल्यामुळे हा फोन याच किंमतीत लाँच होण्याची शक्यता वाढली आहे.  

Oppo Reno 6 Pro 5G चे स्पेसीफाकेशन्स   

Oppo Reno 6 Pro 5G मध्ये  6.55 इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात येईल. या ओप्पो स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 1200 प्रोसेसर आणि 12GB रॅम दिला जाऊ शकतो. रेनो 6 प्रो 5G मधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh ची बॅटरी मिळेल.   

Reno 6 चे स्पेसीफाकेशन्स   

Reno 6 मध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक Dimensity 900 SoC सह 12GB पर्यंतचा रॅम मिळेल. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा वाईड अँगल सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. Reno 6 मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच 4,300mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह देण्यात येईल.   

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड