शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

घायाळ करणाऱ्या डिजाईनसह आला सर्वात पावरफुल Smartphone; इतकी आहे Oppo Find X5 आणि Oppo Find X5 Pro ची किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: February 24, 2022 18:51 IST

Oppo Find X5 आणि Oppo Find X5 Pro आज लाँच झाले आहेत. यात Qualcomm Snapdragon 8 Gen, 80W SuperVooc Flash चार्जिंग आणि 5000mAh ची बॅटरी असे स्पेक्स मिळतात.  

Oppo Find X5 Series आज जागतिक बाजारात सादर करण्यात आली आहे. कंपनीनं या सीरिजमध्ये आपला सर्वात पावरफुल स्मार्टफोन Oppo Find X5 Pro लाँच केला आहे. सोबत गेल्यावर्षीच्या फ्लॅगशिप प्रोसेसरसह Oppo Find X5 सादर झाला आहे. चला जाणून घेऊया या दमदार सीरिजची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.  

Oppo Find X5 Pro Specification 

Oppo Find X5 Pro मध्ये 6.7 इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा सर्वात पावरफुल Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर मिळतो. हा स्मार्टफोन कलरओएस 12.1 वर चालतो. यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

हा डिवाइस 80W SuperVooc Flash चार्जिंगला सपोर्ट करतो. सोबत 5000mAh ची ड्युअल सेल बॅटरी देण्यात आली आहे. जी फक्त 15 मिनिटांत 50 टक्के चार्ज होते. स्मार्टफोनच्या मागे 50MP चा मेन कॅमेरा, 50MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 13MP ची टेलीफोटो लेन्स मिळते. तर फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32MP चा कॅमेरा मिळतो.  

Oppo Find X5 Specification 

या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. यात गेल्यावर्षीचा फ्लॅगशिप Snapdragon 888 प्रोसेसर मिळतो. हा फोन 8GB RAM आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनमध्ये 80W SuperVooc आणि 30W AIRVOOC चार्जिगसह 4,800mAh ची बॅटरी मिळते. यात प्रो मॉडेलसारखा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 

Oppo Find X5 Series Price 

जागतिक बाजारात Oppo Find X5 ची किंमत 999 युरो (जवळपास 84,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर मोठ्या Oppo Find X5 Pro साठी 1299 युरो (जवळपास 1,00,000 रुपये) द्यावे लागतील. हे स्मार्टफोन्स Ceramic White आणि Glaze Black कलरमध्ये 14 मार्चपासून विकत घेता येतील. भारतीय बाजारातील उपलब्धता मात्र अजूनही समजली नाही. 

हे देखील वाचा:

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान