शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Oppo Air Glass: स्मार्टफोन सतत हातात ठेवण्याची गरज नाही; Oppo चा स्मार्ट चष्मा करेल सर्व कामं  

By सिद्धेश जाधव | Updated: December 15, 2021 12:04 IST

Oppo Air Glass:  Oppo Air Glass सादर झाला आहे. हा चष्मा सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाईल. यात ओप्पोनं बनवलेल्या मायक्रो प्रोजेक्टरचा वापर करण्यात आला आहे.

Oppo नं आपल्या Inno Day Event 2021 मध्ये कमाल केली आहे. कंपनीनं Oppo Air Glass चष्मा सादर केला आहे. असिस्टेड रियालिटी (AR) टेक्नॉलॉजीवर चालणाऱ्या या विएरेबल डिवाइसची निर्मिती ओप्पोनं केली आहे. यातील स्पार्क मायक्रो प्रोजेक्टर डोळ्यांसमोर सर्व माहिती दाखवण्याचं काम करतो. हा एयर ग्लास पुढील वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान चीनमध्ये सादर केला जाईल. चला जाणून घेऊया या चष्म्याची वैशिष्ट्ये.  

Oppo Air Glass  

साध्या चष्म्याप्रमाणे ओप्पो एयर ग्लास वापरता येईल. हे ग्लासेस ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन रंगात विकत घेता येतील. सोबत दोन कस्टम फ्रेम अ‍ॅक्सेसरीज देखील कंपनी देणार आहे. ओप्पोनं याचा उल्लेख लाईटवेट मोनॉकल वेवगाइड डिवाइस म्हणून केला आहे. एयर ग्लासमध्ये ओप्पोनं बनवलेल्या मायक्रो प्रोजेक्टरचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात अ‍ॅडव्हान्स मायक्रो एलईडी आणि कस्टम वेव टेक्नॉलजी देण्यात आली आहे.  

एयर ग्लासमध्ये 16 लेव्हल ग्रे स्केल आणि 256 लेव्हल ग्रे स्केल असे दोन डिस्प्ले मोड मिळतील. हा डिस्प्ले 1400 निट्स पर्यंतच्या ब्राईटनेसला सपोर्ट करतो. त्यामुळे उन्हात देखील डिस्प्लेवरील माहिती डोळ्यांना दिसेल. हे ग्लासेस ओप्पो वॉच 2 किंवा Color OS11 आणि त्यावरील ओएस असलेल्या डिव्हाइसेसशी कनेक्ट करता येईल.  

ओप्पो एयर ग्लास टच, व्हॉइस, हेड मूवमेंट आणि हॅन्ड मोशननं नियंत्रित करता येईल. उदा. तुम्ही तुमचं डोकं हलवून नोटिफिकेशन ओपन आणि क्लोज करू शकाल. हे ग्लासेस तुम्हाला वेदर, हेल्थ आणि नेव्हिगेशनची माहिती डोळ्यांसमोर देऊ शकतात, त्यासाठी तुम्हाला वारंवार स्मार्टफोन बघण्याची गरज नाही. तर यातील टेलीप्रॉमप्टर फिचर तुमच्या प्रेजेंटेशनमध्ये मदत करेल. हा स्मार्ट चष्मा चालू संभाषणाचे भाषांतर करू शकतो. सध्या चिनी आणि इंग्रजी भाषेचा सपोर्ट देण्यात आला आहे. लवकरच अन्य भाषा देखील दिल्या जातील.  

टॅग्स :oppoओप्पोtechnologyतंत्रज्ञान