शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Oppo A54s स्मार्टफोनची किंमत झाली लीक; लाँच होण्याआधीच रॅम, स्टोरेज आणि कलर व्हेरिएंट्सचा खुलासा 

By सिद्धेश जाधव | Updated: October 8, 2021 12:36 IST

Budget Android Phone Oppo A54s Price In India: Oppo A54s कंपनीचा आगामी बजेट स्मार्टफोन आहे, जो लवकरच भारतासह जागतिक बाजारात सादर केला जाऊ शकतो.

ओप्पोने गेल्या आठवड्यात आपला एक बजेट स्मार्टफोन A-Series अंतर्गत सादर केला होता. हा फोन Oppo A55 नावाने भारतात सादर करण्यात आला आहे. आता कंपनी या सीरिजमधील अजून एका स्मार्टफोनवर काम करत असल्याची बातमी आली आहे. एका मीडिया रिपोर्टमधून आगामी Oppo A54s स्मार्टफोनच्या किंमत, रॅम, स्टोरेज आणि कलर व्हेरिएंटची माहिती लीक झाली आहे.  

ओप्पोने अधिकृतपणे Oppo A54s ची कोणतीही माहिती दिली नाही. परंतु MySmartPrice आणि टिपस्टर सुधांशुने या आगामी ओप्पो फोनच्या किंमतीची माहिती शेयर केली आहे. त्याचबरोबर सुधांशुने या फोनच्या स्टोरेज आणि कलर ऑप्शनचा खुलासा देखील केला आहे. हा स्मार्टफोन Oppo A54 स्मार्टफोनचा अपग्रेड म्हणून बाजारात दाखल होईल.  

Oppo A54s ची संभाव्य किंमत 

लीकमधून Oppo A54s स्मार्टफोनच्या एकाच व्हेरिएंटची किंमत समजली आहे. या मॉडेलमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिली जाऊ शकते. या फोनची किंमत 200 यूरो ते 250 यूरो दरम्यान असू शकते. म्हणजे हा फोन 17,000 ते 21,000 भारतीय रुपयांच्या बजेटमध्ये सादर केला जाऊ शकतो. ही युरोपियन बाजारातील किंमत आहे, भारतात हा फोन 15 हजार रुपयांच्या आत सादर केला जाऊ शकतो. तसेच हा फोन पर्ल ब्लू आणि क्रिस्टल ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शनसह खरेदी करता येईल.  

हा फोन जागतिक बाजारात किंवा भारतात कधी लाँच होईल याची माहिती मात्र अजून समजली नाही. तसेच या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स देखील अजून लीक झाले नाहीत. एवढे मात्र निश्चित आहे कि आगामी Oppo A54s स्मार्टफोन Oppo A54 चा अपग्रेड असेल.  

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान