शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

5,000mAh बॅटरीसह OPPO A16s लाँच; जाणून घ्या या लो बजेट स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

By सिद्धेश जाधव | Updated: August 16, 2021 16:38 IST

OPPO A16s launch: ओपोने हा नवीन स्मार्टफोन नेदरलँडमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह लाँच केला गेला आहे.

ठळक मुद्देओपोने हा नवीन स्मार्टफोन नेदरलँडमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह लाँच केला गेला आहे.या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट आणि पावरव्हीआर जीपीयू देण्यात आला आहे. OPPO A16s च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे

गेल्या महिन्यात इंडोनेशियात लाँच करण्यात आलेल्या OPPO A16 स्मार्टफोनचा नवीन व्हर्जन आता जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. ओप्पोने ए सीरिजमध्ये OPPO A16s स्मार्टफोन नेदरलँडमध्ये सादर केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेकचा Helio G35 चिपसेट देण्यात आला असून हा स्मार्टफोन 5000mAh  च्या दमदार बॅटरीला सपोर्ट करतो.  

OPPO A16s चे स्पेसिफिकेशन्स 

ओपो ए16एस स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.52 इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या फोनमध स्टॅंडर्ड रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट आणि पावरव्हीआर जीपीयू देण्यात आला आहे. हा ओप्पो फोन अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11.1 वर चालतो. हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो.  

हे देखील वाचा: पावरफुल Honor Magic 3 सीरिज लाँच; फ्लॅगशिप प्रोसेसरसह तीन स्मार्टफोन सादर

OPPO A16s च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए16एस मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

OPPO A16s ची किंमत 

ओपोने हा नवीन स्मार्टफोन नेदरलँडमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह लाँच केला गेला आहे. या फोनची किंमत 149 Euros ठेवण्यात आली आहे. ही किंमत 13,000 भारतीय रुपयांच्या आसपास आहे. हा फोन भारतात कधी सादर केला जाईल, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.  

हे देखील वाचा: बॅगेत टाकून कुठेही नेता येणार हा इंडक्शन कुकर; आकाराने प्लेटपेक्षाही स्लिम

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड