शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बापरे! यूट्यूब व्हिडीओ आणि गुगल रिव्ह्यूच्या जाळ्यात अडकले 15 हजार लोक; गमावले 700 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 14:42 IST

एका चीनी ऑपरेटरने 15,000 हून अधिक लोकांना 700 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली.

ऑनलाईन फ्रॉ़ड सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. प्रत्येक व्यवसायातील लोक मग ते इंजिनियर असो की डॉक्टर, त्यांना जाळ्यात अडकवलं जात आहे. पुन्हा एकदा असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चीनी ऑपरेटरने 15,000 हून अधिक लोकांची 700 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली. सोप्या मार्गाने पैसे कमावण्याच्या बहाण्याने हा संपूर्ण फ्रॉड करण्यात आला आहे. सर्वसामान्य आणि कमी शिकलेले लोक याआधी फसवणुकीत अडकले आहेत. ही बाब उघडकीस आल्यानंतर लाखोंची कमाई करणारे सॉफ्टवेअरही जाळ्यात सापडल्याचं समोर आलं आहे.

हैदराबादचे पोलीस आयुक्त सीवी आनंद म्हणतात की, सायबर ठग लोकांना फसवून अतिशय सोप्या पद्धतीने पैसे कमवतात. यामध्ये यूट्यूब व्हिडीओ लाईक करणे आणि गुगल रिव्ह्यू लिहिणं असं काम दिलं जातं. हैदराबाद पोलिसांनी सांगितले की, चीनी ऑपरेटर्सनी आतापर्यंत क्रिप्टो वॉलेटच्या फसवणुकीद्वारे सुमारे 712 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत देशाच्या विविध भागातून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी अनेक क्रिप्टोवॉलेट व्यवहार हिजबुलाह वॉलेटद्वारे केले गेले होते, जे दहशतवादी फंडिंग मॉड्यूलशी जोडलेले होते.

इंजिनिअरने गमावले 82 लाख

लाखो रुपयांचे पॅकेज घेणारे इंजिनिअर देखील त्यांच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी सांगितली आहे. अशाच एका सॉफ्टवेअर व्यावसायिकाने झटपट पैसे कमावण्याच्या लोभापायी अडकून 82 लाख रुपये गमावले. तसेच आतापर्यंत अनेक डॉक्टर, इंजिनिअर आणि इतर व्यावसायिकही या जाळ्यात अडकले आहेत. सहज पैसे कमवण्याची हाव कोणालाही आपल्या जाळ्यात अडकवू शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हैद्राबादच्या रहिवाशाने पोलिसांना सांगितले की, घोटाळे करणारे रेट आणि रिव्ह्यू करण्याची पार्ट टाईम नोकरी देतात. मेसेजिंग एपद्वारे, ते काही व्हिडीओ पाहण्याचे नाटक करतात आणि त्यांना रेट करतात आणि त्यांचा रिव्ह्यू करतात. या सोप्या कामासाठी 1000 रुपये गुंतवून 5 स्टार रेटिंग देण्यास सांगितले आहे. यानंतर 866 रुपयांचा नफा आहे. नंतर ती वाढवून 25 हजार करण्यात आली आणि 20 हजाराचा नफा दिला. नफ्याचे पैसे काढण्याची परवानगी नाही. तसेच गुंतवणूक व नफा 28 लाखांपर्यंत वाढवून नंतर सर्व रक्कम हडप केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम