शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

OnePlus 9RT India: OnePlus RT ची भारतीय किंमत आली समोर; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस 

By सिद्धेश जाधव | Updated: December 2, 2021 19:57 IST

OnePlus 9RT India: चीनमध्ये लाँच झालेला OnePlus 9RT स्मार्टफोन भारतात OnePlus RT नावानं सादर होणार आहे.  

OnePlus 9RT India: वनप्लसच्या जागतिक बाजारातील OnePlus 9RT फोनची चाहते आतुरतेनं वाट बघत आहेत. चीनमध्ये आलेला हा फोन भारतात मात्र OnePlus RT या नव्या नावानं सादर केला जाईल, परंतु या या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन बदलणार नाहीत. नावाप्रमाणे देशात येताना या फोनची किंमत देखील बदलणार आहे.  

OnePlus RT India price  

The Mobile Indian च्या रिपोर्टनुसार , OnePlus RT चा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात 39,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. ही किंमत 37,999 रुपयांवर देखील जाऊ शकते. तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 34,999 रुपये मोजावे लागू शकतात. याआधी आलेल्या लीकमध्ये Onelus RT ची किंमत 40,000 ते 44,000 रुपये असेल, असं सांगण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार OnePlus RT भारतात 16 डिसेंबरला लाँच होईल.  

OnePlus RT चे स्पेसिफिकेशन्स 

OnePlus RT मध्ये 6.62-चाचा फुल एचडी+ E4 अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन, 1300 निट्स पीक ब्राईटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये कंपनीने क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरची पॉवर दिली आहे. त्याचबरोबर 12GB पर्यंतचा लेटेस्ट LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. विशेष म्हणजे हा फोन OxygenOS ऐवजी अँड्रॉइड 11 आधारित Oppo च्या ColorOS वर चालतो.   

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 16MP चा अल्ट्रावाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा Sony IMX471 सेल्फी शुटर देण्यात आला आहे. OnePlus RT मधील 4,500mAh ची ड्युअल-सेल बॅटरी 65W Warp Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.   

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान