शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

OnePlus युजर्स त्वरा करा! मोफत बदलून मिळणार जुन्या फोनमधील बॅटरी; जाणून घ्या कंपनीची ऑफर 

By सिद्धेश जाधव | Updated: August 27, 2021 14:21 IST

OnePlus Battery Replacement Offer: वनप्लसने काही जुन्या स्मार्टफोन्सच्या बॅटरीज बदलण्याची ऑफर सादर केली आहे. जुन्या मॉडेल्सच्या बॅटरीजचा उरलेला स्टॉक संपवण्यासाठी कंपनीने ही ऑफर आणली आहे.

वनप्लस इंडिया आपल्या काही जुन्या स्मार्टफोन मॉडेल्सची बॅटरी मोफत बदलून देत आहे. कंपनी भारतात वनप्लस 3, वनप्लस 5 सीरीज आणि वनप्लस 6 सीरीजमधील स्मार्टफोनची बॅटरी मोफत बदलून देत आहे, अशी माहिती एका रेडिट युजरने दिली आहे. या ऑफरमध्ये युजर्सकडून बॅटरीसाठी एक रुपया देखील घेतला जाणार नाही, परंतु ग्राहकांना लेबर चार्जेस द्यावे लागतील.  

OnePlus Battery Replacement ऑफर 

वनप्लसने काही जुन्या स्मार्टफोन्सच्या बॅटरीज बदलण्याची ऑफर सादर केली आहे. या ऑफरची माहिती रेडिटच्या माध्यमातून समोर आली आहे. बॅटरी जरी मोफत मिळत असली तरी ग्राहकांना लेबर चार्जेस द्यावे लागणार आहेत. ही एक वॉक-इन सर्विस आहे, त्यामुळे तुमचा मोबाईल तुम्हाला सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जावा लागेल.  

जे वनप्लस युजर्स जुना फोन दीर्घकाळ वापरण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही चांगली ऑफर आहे. रेडिटनुसार OnePlus 5T ची बॅटरी बदलून घेण्यासाठी फक्त 473 रुपये द्यावे लागतील. कंपनीने मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु जुन्या मॉडेल्सच्या बॅटरीजचा उरलेला स्टॉक संपवण्यासाठी कंपनीने ही ऑफर आणल्याचे रेडिट पोस्टमधून समजले आहे.  

आगामी OnePlus 9 RT चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

OnePlus 9 RT मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित आक्सिजनओएस 12 वर चालेल. हा फोन OxygenOS 12 सह लाँच होणारा पहिला स्मार्टफोन असेल. रिपोर्टनुसार या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 870प्लस चिपसेट मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी या वनप्लस फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात येईल. वनप्लस 9 आरटी मधील 4,500एमएएचची बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते.   

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोन