शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

एकच नंबर! स्वस्तात मिळणार जबरदस्त फास्ट चार्जिंग; OnePlus करणार रेडमीची बोलती बंद  

By सिद्धेश जाधव | Updated: May 30, 2022 15:01 IST

OnePlus Ace Racing Edition स्मार्टफोन आता भारतात नव्या नावानं सादर केला जाऊ शकतो.  

OnePlus 10R स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात लाँच करण्यात आला आहे. यातील 150W फास्ट चार्जिंग याची खासियत आहे. आता या हँडसेटचा लाईट व्हर्जन अर्थात OnePlus 10R Lite देखील भारतीय बाजारात येऊ शकतो. हा चीनमध्ये आलेल्या OnePlus Ace Racing Edition चा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो. वनप्लस 10आर लाईट मॉनिकर अलीकडेच मॉडेल नंबर PGZ110 सह भारतीय IMEI डेटाबेस वेबसाईटवर दिसला आहे. वनप्लस 10R लाईटची अचूक अशी लाँच डेट मात्र समोर आली नाही. परंतु हा हँडसेट भारतीय IMEI डेटाबेसवर दिसला आहे, त्यामुळे लवकरच याची भारतात एंट्री होऊ शकते.  

OnePlus Ace Racing Edition चे स्पेसिफिकेशन्स 

OnePlus Ace Racing Edition मध्ये 6.59 इंचाचा FHD+ LTPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्प्लिंग रेटला सपोर्ट करतो. या शानदार स्मार्टफोनमध्ये कंपनीनं MediaTek Dimensity 8100 Max चिपसेट दिला आहे. सोबत 12GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 इंटरनल स्टोरेज मिळते. फोन Android 12 वर बेस्ड ColorOS 12 वर चालतो.  

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे. त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा कॅमेरा मिळतो. या 5G फोनमध्ये Wi-Fi 6 व ब्लूटूथ 5.3 सारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात. सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.  वनप्लस फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.  

किंमत 

OnePlus Ace Racing Edition स्मार्टफोनच्या 8GB/128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,999 युआन (जवळपास 23,000 रुपये) आहे. 8GB/256GB मॉडेल 2,199 युआन (जवळपास 25,300 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तर हायएन्ड मॉडेल 12GB RAM व 256GB स्टोरेजसह 2,499 युआन (जवळपास 28,800 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हा फोन Athletics Grey आणि Lightspeed Blue कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल