शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

आयफोनलाही टक्कर देणाऱ्या Oneplus 10 Pro चा पहिला सेल आज; मिळतोय जबराट डिस्काउंट 

By सिद्धेश जाधव | Updated: April 5, 2022 12:02 IST

OnePlus 10 Pro भारतात 12GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 32MP Selfies Camera आणि 80W SuperVOOC सारख्या स्पेसिफिकेशन्ससह आला आहे.   

गेल्या आठवड्यात OnePlus 10 Pro स्मार्टफोन भारतात 12GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 32MP Selfies Camera आणि 80W SuperVOOC सारख्या स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. आज अर्थात 5 एप्रिलला या फोनचा पहिला सेल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आणि कंपनीच्या वेबसाईटवर दुपारी 12 वाजल्यापासून आयोजित करण्यात येईल. त्याचबरोबर कंपनीचे Bullets Z2 ब्लूटूथ नेकबँड आणि Buds Pro वायरलेस इयरबड्स देखील विकत घेता येतील.  

OnePlus 10 Pro ची किंमत 

वनप्लस 10 प्रो स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 66,999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज 71,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन अ‍ॅमराल्ड फॉरेस्ट आणि वॉल्केनिक ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल. तसेच जर तुम्ही हा फोन कंपनीच्या वेबसाईटवर विकत घेतला आणि SBI च्या क्रेडिट कार्डनं पेमेंट केलं तर तुम्हाला 4,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल.  

OnePlus 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

वनप्लस 10 प्रोमध्ये 6.7 इंचाचा 2के फ्ल्यूड अ‍ॅमोलेड एलटीपीओ 2.0 डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल डिजाईन असलेला हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश आणि 480हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शनसह यात एचडीआर10+ आणि एमईएमसी सारखे फीचर्स मिळतात.  

हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. यात 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी या फ्लॅगशिप किलरमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80W वायर्ड फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करते.   

वनप्लस 10 प्रो लेटेस्ट अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 12GB वेगवान LPDDR5 RAM आणि 256GB लेटेस्ट UFS 3.1 storage देण्यात आली आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंट देण्यात आला आहे. 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलAndroidअँड्रॉईड