शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आता हुआवेचा घडी होणारा स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: April 2, 2018 17:00 IST

जगभरातील स्मार्टफोन उत्पादकांमध्ये घडी होणार्‍या स्मार्टफोनबाबत चुरस निर्माण झाली असतानाच आता हुआवे कंपनीने याच प्रकारातील स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत दिले आहेत.

जगभरातील स्मार्टफोन उत्पादकांमध्ये घडी होणार्‍या स्मार्टफोनबाबत चुरस निर्माण झाली असतानाच आता हुआवे कंपनीने याच प्रकारातील स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत दिले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून घडी होणारा स्मार्टफोन हा औत्सुक्याचा विषय बनला आहे. या स्पर्धेत अ‍ॅपल, सॅमसंग आदींसह अनेक चीनी कंपन्यांनी उडी घेतल्यामुळे याबाबतची चुरस वाढली आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस झेडटीई कंपनीने अ‍ॅक्झॉन एम हा घडी होणारा जगातील पहिला स्मार्टफोन लाँच करून यात अनपेक्षितपणे आघाडी घेतली.तथापि, यापेक्षा अधिक सुलभपणे ऑपरेट होणारा स्मार्टफोन उत्पादीत करण्याची शर्यत अजून संपलेली नाही. येत्या काही महिन्यांमध्ये अ‍ॅपल, सॅमसंग आदी कंपन्या या प्रकारातील मॉडेल सादर करणार असल्याची चर्चा सुरू असतांनाच हुआवे या चीनी कंपनीला घडी होणार्‍या स्मार्टफोनचे पेटंट मिळाले आहे. यामुळे जागतिक पातळीवर तिसर्‍या क्रमांकाची स्मार्टफोन कंपनी म्हणून लौकीक असणारी हुआवे यात आघाडी घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या पेटंटच्या माहितीनुसार हुआवेच्या आगामी स्मार्टफोनमध्ये दोन डिस्प्ले असतील. बंद केल्यानंतर याला एका डिस्प्लेवरून स्मार्टफोन म्हणून वापरता येईल. तर याला उघडले असता मोठा डिस्प्ले तयार होऊन याचा टॅबलेट म्हणून वापर करता येईल. म्हणजेच हे उपकरण बहुपर्यायी असेल. आजवर लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारात वापरता येणारी अनेक उपकरणे बाजारपेठेत सादर करण्यात आली आहेत. मात्र टॅबलेट आणि स्मार्टफोन या दोन्ही प्रकारांमध्ये वापरण्याजोगा स्मार्टफोन हुआवे कंपनी लवकरच सादर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल