शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आता घटस्फोटाच्या मदतीसाठी डायव्होर्सकार्ट अ‍ॅप

By शेखर पाटील | Updated: November 27, 2017 13:21 IST

देशातील घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्‍वभूमीवर आता डायव्होर्सकार्ट या नावाने स्वतंत्र अ‍ॅप सादर करण्यात आले असून यात एकमेकांपासून काडीमोड हवा असणार्‍या जोडप्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.

सध्या देशातील सर्वात चिंताजनक विषय म्हणजेच घटस्फोट होय. जवळपास प्रत्येक समाजात याचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले आहे. कुणाही दाम्पत्याला घटस्फोट हवा असल्यास त्याला सध्या तरी वकिलाकडे जाऊन कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. मात्र आजच्या आधुनिक युगात सर्वच घटक स्मार्ट होत असतांना याला घटस्फोटही अपवाद कसा राहणार ? नेमकी हीच बाब लक्षात घेत वंदना शहा या विख्यात महिला विधिज्ज्ञाने डायव्होर्सकार्ट या नावाने स्वतंत्र अ‍ॅप सादर केले आहे.

शहा या स्वत: घटस्फोटात स्पेशालिटी असणार्‍या वकील म्हणून ओळखल्या जातात. त्या वर्तमानपत्रांमधील लेखांच्या माध्यमातून घटस्फोटाबाबत माहितीसुद्धा वेळोवेळी देत असतात. मात्र डायव्होर्सकार्टच्या माध्यमातून त्या थेट काडीमोड करण्यासाठी इच्छुक असणार्‍या स्त्री-पुरूषांना थेट त्यांच्या स्मार्टफोनवरच याबाबत सखोल मार्गदर्शन करणार आहेत. यात घटस्फोटाबाबत विद्यमान कायदेशीर तरतुदींसह संबंधित व्यक्तीच्या अधिकारांच्या माहितीचा समावेश आहे.

यातून कुणालाही घटस्फोट घेण्यासाठी क्रमाक्रमाने नेमके काय करावे? याची माहिती देण्यात येणार आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात आले आहे. सध्या तरी यातील माहिती ही इंग्रजीतून असून लवकरच याचा अन्य भाषांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

वंदना शहा यांनी नुकतेच हे अ‍ॅप सादर केले. याप्रसंगी स्वत:च्या आयुष्यात घटस्फोटांना सामोरे जावे लागणारे अनेक मान्यवर उपस्थित होते. याच्या माध्यमातून कुणालाही अगदी अष्टौप्रहर म्हणजेच २४*७ या प्रकारात मोफत माहिती देण्यात येणार आहे. यात ज्येष्ठ विधिज्ज्ञांकडून रिअल टाईम या पद्धतीत मिळणार्‍या मार्गदर्शनाचा समावेश आहे. तथापि, हे फक्त मार्गदर्शन करणारे अ‍ॅप असून संबंधीत जोडप्यांना यातून माहिती मिळवून प्रत्यक्षात न्यायालयात जाण्याची प्रक्रिया स्वत:लाच करावी लागणार असल्याचेही शहा यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात याआधी हे अ‍ॅप घटस्फोट प्रक्रियेतील सर्व बारकावे संबंधीतांना सांगणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानDivorceघटस्फोट