शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

मस्तच! आता Amazon वरून बुक करता येणार गॅस सिलिंडर, जाणून घ्या नेमकं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 10:37 IST

Amazon Gas Cylinders : अ‍ॅमेझॉनवरून ग्राहक नेहमीच वेगवेगळ्या वस्तू ऑर्डर करत असतात. मात्र आता ग्राहकांना अ‍ॅमेझॉनवर सिलिंडर बुक करता येणार आहे.

नवी दिल्ली - दर महिना अथवा दी़ड महिन्याने गॅस सिलिंडर (Gas Cylinder booking) हा बुक केला जातो. घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना आता आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. अ‍ॅमेझॉनवरून ग्राहक नेहमीच वेगवेगळ्या वस्तू ऑर्डर करत असतात. मात्र आता ग्राहकांना अ‍ॅमेझॉनवर सिलिंडर बुक करता येणार आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाने हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडशी करार केला आहे. त्यानुसार आता HP कंपनीचा सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना अ‍ॅमेझॉनवरुन पैसे भरुन सिलिंडर घेता येणार आहे.

ग्राहकांना त्यामुळे IVRच्या माध्यमातून सिलिंडर बुक करण्याची आवश्यकता नाही. सिलिंडर बुक करायचा असल्यास थेट अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. अ‍ॅमेझॉन पे टॅबवर जाऊन बुकिंग करावं लागेल. त्यानंतर कोणत्याही डिजिटल मोडचा वापर करून पैसे देता येतील. आम्ही डिजिटल पेमेंटमध्ये सातत्याने नवनवीन अनुभव आणण्याचा प्रयत्न करत आहोत अशी माहिती अ‍ॅमेझॉन पे चे सीईओ महेंद्र नेरुरकर यांनी दिली आहे. 

अ‍ॅलेक्सा आणि फायर टीव्ही स्टिक या तंत्रज्ञानाच्या मदतीनेही ग्राहकांना सिलिंडर बुक करता येणार आहे. मात्र, HP गॅस कंपनीच्या ग्राहकांनाच ही सुविधा देण्यात आली असून त्यांनाच अ‍ॅमेझॉनवरून सिलिंडर बुक करता येणार आहे. घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीचे नियम बदलले आहेत. सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी कंपन्या डिलिव्हरी सिस्टिम लागू करण्यात आली आहे. नव्या सिस्टिमला DAC असं नाव देण्यात आलं आहे. त्याचा अर्थ डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असा आहे. 

अ‍ॅमेझॉनवरून असा बुक करा गॅस सिलिंडर

- सिलिंडर बुक करण्यासाठी सर्वप्रथम अ‍ॅमेझॉन पे टॅबवर जा. 

- LPG कॅटेगरीवर क्लिक करावे. 

- तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा HP गॅसचा 17 अंकी नंबर टाकावा लागेल. 

- ग्राहकाच्या मोबाईलवर कन्फर्म करण्यासाठी एक मेसेज येईल. तो कन्फर्म करताच तुमचा सिलेंडर बुक होईल.

- अ‍ॅमेझॉन पेमेंटच्या साहाय्याने पैसे भरल्यास ग्राहकांना 50 रुपयांचा कॅशबॅकही मिळेल.

 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनCylinderगॅस सिलेंडर