शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आता फेसबुक मॅसेंजरवर दिसतील जाहिराती 

By शेखर पाटील | Updated: July 25, 2017 16:31 IST

फेसबुक मॅसेंजरवर आता जाहिराती दिसणार असून या माध्यमातून मॅसेंजरचा व्यावसायिक उपयोग सुरू झाला आहे.

फेसबुक मॅसेंजरवर आता जाहिराती दिसणार असून या माध्यमातून मॅसेंजरचा व्यावसायिक उपयोग सुरू झाला आहे.

फेसबुक मॅसेंजरचे १.२ अब्ज सक्रीय युजर्स आहेत. आधीच फेसबुकने मॅसेंजरचा वापर करून विविध कंपन्यांना आपल्या ग्राहकांशी मर्यादीत प्रमाणात संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा काही कंपन्या चांगला वापर करत आहेत. आता याच कंपन्या आपल्या ग्राहकांना मॅसेंजरवरून जाहिराती पाठवू शकणार आहेत. याआधी फेसबुकने काही कंपन्यांच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया, थायलंड आदी देशांमध्ये याची चाचणी घेण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमिवर आज फेसबुक मॅसेंजरचे प्रॉडक्ट हेड स्टॅन चुडनोव्हस्की यांनी लवकरच मॅसेंजरवरील जाहिरातींची सुविधा अधिकृतपणे सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मॅसेंजरवर आधीच पेमेंट सिस्टीम लागू करण्यात आली आहे. तर भारतात युपीआयवर आधारित प्रणाली येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर जाहिरातींच्या माध्यमातून मॅसेंजरचा व्यावसायिक वापर सुरू होणार आहे. यामुळे आगामी काळात एखाद्या हेल्पलाईन वा ई-मेलप्रमाणे कंपन्या आपल्या ग्राहकांना वेळोवेळी आवश्यक असणारी माहिती तसेच अलर्ट आणि याचसोबत जाहिरातीदेखील मॅसेंजरवरून पाठवू शकतील. मात्र यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे कुणीही अनोळखी युजर्सला व्यावसायिक संदेश पाठवू शकणार नाही. म्हणजेच आधी चॅटींग करण्यात आलेल्या खाते धारकांनाच या माध्यमातून जाहिराती पाठवता येतील. महत्वाची बाब म्हणजे ग्राहकांना या जाहिराती त्रासदायक ठरत असल्यास त्या न पाहण्याची/ब्लॉक करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.