शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नथिंगची 3A सिरीज लाँच! वेगवेगळ्या किंमतीचे दोन स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:46 IST

Nothing Phone 3a and Pro news: दोन्ही फोनच्या किंमतीत मोठे अंतर आहे. दोन्ही फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, तसेच ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे.

काही वर्षांपूर्वीच लाँच झालेल्या नथिंग कंपनीची नवीन सिरीज नुकतीच लाँच झाली आहे. यामध्ये कंपनीने दोन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. Nothing Phone 3a आणि 3a Pro अशी या फोनची नावे आहेत. दोन्ही स्मार्टफोन कंपनीने मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच केले आहेत. 

दोन्ही फोनच्या किंमतीत मोठे अंतर आहे. दोन्ही फोनमध्ये समान गोष्टी म्हणजे ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, तसेच ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. Nothing Phone 3a ची किंमत 24,999 रुपयांपासून सुरु होत आहे. यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिअंट आहे. तर २५६ जीबीच्या स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 

नथिंग फोन थ्रीए प्रोची किंमत 29,999 रुपयांपासून सुरु होत आहे. यामध्ये ८/१२ जीबी रॅम आणि १२८, २५६ जीबी स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. या फोनची किंमत 31,999 रुपयांपर्यंत आहे. दोन्ही स्मार्टफोन ११ मार्चपासून फ्लिपकार्ट, क्रोमा, विजय सेल्स आदी ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. 

Nothing Phone 3a फोन खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा...

डिस्प्ले...नथिंग फोन ३ए आणि फोन ३ए प्रो मध्ये ६.७७-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि पांडा ग्लास प्रोटेक्शन यामध्ये देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७एस जेन ३ प्रोसेसर देण्यात आलेला आहे. 

नथिंग थ्रीए प्रो खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा...

कॅमेरा...

फोन ३ए प्रो मध्ये ५० एमपी प्रायमरी लेन्स, ५० एमपी पेरिस्कोप लेन्स आणि ८ एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहेत. ५० एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर नथिंग  3a मध्ये 50MP चा प्रायमरी लेन्स, 50MP चा टेलिफोटो लेन्स आणि 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. ३२ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन