शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

iPhone चं टेन्शन वाढवण्यासाठी Nokia आणतोय 3 दिवस चालणारा खास Smartphone, फीचर्स वाचून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 09:39 IST

माध्यमांतील वृत्तांनुसार, नोकिया जो स्मार्टफोन लॉन्च करणार आहे त्याचे नाव Nokia Zeno Lite 2022 अथवा Nokia Zeno Lite 2023, असू शकते.

आपण मोबाईल वापरत असाल तर नोकिया हे नाव नक्कीच ऐकले असेल. एक काळ होता, जेव्हा नोकिया बाजारावर राज्य करायचा. त्यांचा प्रत्येक फोन अत्यंत लोकप्रीय होता. पण स्मार्टफोन आला आणि नोकियाचे राज्य गेले. मात्र आता तो पुन्हा एकदा बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. नोकिया एक जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन तयार करत असल्याचे वृत्त आहे. नोकिया दरवर्षी कमी बजेटपासून ते फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करतो. माध्यमांतील वृत्तांनुसार, नोकिया जो स्मार्टफोन लॉन्च करणार आहे त्याचे नाव Nokia Zeno Lite 2022 अथवा Nokia Zeno Lite 2023, असू शकते.

Nokia Zeno Lite Launch Date -Nokia Zeno Lite चे वृत्त आल्यापासून, हा केव्हा लॉन्च होणार आणि काय काय फीचर्स असणार हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा आहे. मात्र, कंपनीने या फोन संदर्भात अद्याप काहीही सांगितलेले नाही. महत्वाचे म्हणजे हा फोन लॉन्च होणार की नाही यासंदर्भातही अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्यातरी केवळ अंदाजच बांधले जात आहेत. 

Nokia Zeno Lite Expected Specifications -माध्यमांतील वृत्तांनुसार, Nokia Zeno Lite मध्ये 6.9-इंच का सुपर AMOLED डिस्प्ले असेल, तो Gorilla Glass 7 ने प्रोटेक्टेड असेल. यात ऑलवेज ऑन डिस्प्ले असेल, असा कयास लावला जात आहे. म्हणजेच फोनची स्कीन नेहमीच ऑन असेल. पण फार बॅटरी खानार नाही.

Nokia Zeno Lite Expected Camera -वृत्तांनुसार, Nokia Zeno Lite मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळू शकते. यात 108MP ची प्राइमरी लेन्स, 32MP ची अल्ट्रा वाईड, 16MP वाईड आणि 5MP चे डेप्थ सेन्सर असेल. याच बरोबर समोरच्या बाजूने 64MP चा सेल्फी शूटर मिळू शकतो.

Nokia Zeno Lite Expected BatteryNokia Zeno Lite च्या बॅटरीसंदर्भात बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 7100mAh ची बॅटरी असेल आणि हिला 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल, अशी अफवा आहे. याच बरोबर हा फोन 3 दिवसांपर्यंत आरामात चालेल, असेही बोलले जात आहे. फोन मध्ये 8/12GB RAM आणि 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज मिळू शकते. या फोनच्या किंमती संदर्भात अद्याप कुठल्याही प्रकराची माहिती नाही. जसे की, आम्ही वर सांगिल्याप्रमाणे, या फोनसंदर्भात कंपनीने अद्याप कुठल्याही प्रकारचा उल्लेखही केलेला नाही. हे केवळ माध्यमांतील अंदात आहेत. कदाचित कंपनी या फोनसंदर्भात अद्याप केवळ विचारच करत असेल, असेही असू शकते. 

टॅग्स :NokiaनोकियाSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल