शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मजबूत बॉडी असलेला Nokia XR20 येणार भारतीयांच्या भेटीला; प्री-बुकिंग तारखेची घोषणा 

By सिद्धेश जाधव | Published: October 14, 2021 7:25 PM

Nokia XR20 Launch Date, Price And Specifications: Nokia XR20 स्मार्टफोन भारतात 20 ऑक्टोबरपासून प्री बुक करता येईल. हा 5G रगेड स्मार्टफोन याआधी जागतिक बाजारात लाँच झाला आहे.

नोकिया आपला मिलिटरी ग्रेड स्मार्टफोन Nokia XR20 भारतात लाँच करणार आहे. कंपनीने या फोनच्या लाँचची माहिती ट्विटरवरून दिली होती. आज कंपनीने या फोनच्या प्री-बुकिंगची तारीख सांगितली आहे. Nokia XR20 स्मार्टफोन भारतात 20 ऑक्टोबरपासून प्री बुक करता येईल. हा 5G रगेड स्मार्टफोन याआधी जागतिक बाजारात लाँच झाला आहे आणि आता लवकरच हा मजबूत फोन भारतीयांच्या भेटीला येईल.  

Nokia XR20 5G एक मिल्ट्री ग्रेड रगेड स्मार्टफोन आहे. हा उंचावरून पडून देखील सुरक्षित राहू शकतो. यात IP68 वॉटर अँड डस्ट रेजिस्टन्ससह स्क्रॅच रेजिस्टन्स, ड्रॉप रेजिस्टन्स आणि टेम्परेचर रेजिस्टन्स देण्यात आला आहे. यामुळे या स्मार्टफोनला कोणतेही बॅक कव्हर किंवा स्क्रीन गार्ड लावण्याची गरज नाही.   

Nokia XR20 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Nokia XR20 मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले Gorilla Glass Victus च्या सुरक्षेसह येतो. पंच होल कॅमेरा असेलेल्या नोकिया XR20 मध्ये Qualcomm Snapdragon 480 चिपसेट आणि Android 11 वर चालतो. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. HMD Global या स्मार्टफोनमध्ये 3 वर्ष OS अपडेट आणि 4 वर्ष मासिक सेफ्टी अपडेट देणार आहे.    

फोटोग्राफीसाठी Nokia XR20 मध्ये कंपनीने ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कनेक्टिविटीसाठी या नोकिया स्मार्टफोनमध्ये USB Type-C पोर्ट, 3.5mm जॅक आणि ब्लूटूथ 5.1 आहे. या फोनमधील 4630mAh ची बॅटरी 18W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.    

टॅग्स :NokiaनोकियाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान