शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नोकियाच्या मॉडेल्सला मिळणार फेस अनलॉक फिचर

By शेखर पाटील | Updated: July 11, 2018 17:48 IST

नोकिया ब्रँडच्या चार मॉडेल्सला लवकरच फेस अनलॉक हे फिचर अपडेटच्या स्वरूपात मिळणार

एचएमडी ग्लोबल कंपनीची मालकी असणार्‍या नोकिया ब्रँडच्या चार मॉडेल्सला लवकरच फेस अनलॉक हे फिचर अपडेटच्या स्वरूपात मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

अलीकडच्या काळात उच्च श्रेणीच नव्हे तर अगदी मिड रेंजमधील तर काही किफायतशीर मूल्याच्या मॉडेल्समध्येही फेस अनलॉक हे फिचर देण्यात येत आहे. विशेष करून बहुतांश चीनी कंपन्यांनी आपल्या बजेट मॉडेल्समध्ये हे फिचर्स दिले आहे. अर्थात आज फेस अनलॉक फिचरचा वापर वाढत असल्याची बाबदेखील याला कारणीभूत आहे. या पार्श्‍वभूमीवर, लवकरच नोकियाच्या चार स्मार्टफोन्समध्ये फेस अनलॉक फिचर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नोकिया ८, नोकिया ८ सिरोक्को, नोकिया ७ प्लस आणि नोकिया ६ या मॉडेल्समध्ये येत्या काही दिवसांमध्ये फेस अनलॉक करण्याची सुविधा मिळणार आहे.

आयफोन-एक्समधील फेस आयडी तंत्रज्ञानानंतर अँड्रॉइड प्रणालीत फेस अनलॉक फिचरचा वापर वाढला आहे. विशेष करून आयफोनप्रमाणेच आता अँड्रॉइडमध्येही हे फिचर अतिशय सुरक्षित पध्दतीत वापरता येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, नोकियानेही आपल्या युजर्सला ही सुविधा देण्याचे ठरविले आहे. काही युजर्सने याबाबत नोकिया कंपनीकडे केलेल्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. याला दिलेल्या उत्तरात कंपनीने नोकिया ८, नोकिया ८ सिरोक्को, नोकिया ७ प्लस आणि नोकिया ६ या मॉडेल्सला ओटीए अपडेटच्या माध्यमातून फेस अनलॉकची सुविधा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एचएमडी ग्लोबल कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपल्या याच मॉडेल्समध्ये अँड्रॉइडच्या ओरियो या अद्ययावत आवृत्तीचे अपडेट देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या पाठोपाठ आता ग्राहकांना फेस अनलॉकची सुविधादेखील मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :Nokiaनोकियाtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल