शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विंडोज 11 सपोर्टसह Nokia PureBook S14 लॅपटॉप सादर; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

By सिद्धेश जाधव | Updated: September 28, 2021 17:27 IST

Budget Laptop Nokia PureBook S14 Price In India: Nokia PureBook S14 लॅपटॉपची किंमत 56,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा लॅपटॉप फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.  

नोकियाने आज भारतात लॅपटॉप, दोन टीव्ही रेंज आणि हेडसेट सादर केले आहेत. हे डिवाइस फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होतील. 3 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या बिग बिलियन डेज सेलमधून यांच्या विक्रीला सुरवात होईल. Nokia PureBook S14 लॅपटॉपमध्ये Windows 11 सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात 11th Gen Intel Core प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया नोकियाच्या नव्या लॅपटॉपची किंमत आणि स्पेसीफिकेशन्स.  

Nokia PureBook S14 ची किंमत  

Nokia PureBook S14 लॅपटॉपची किंमत 56, 990 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने या लॅपटॉपचा एकमेव व्हेरिएंट बाजारात उतरवला आहे, जो 3 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.  

त्याचबरोबर फर्स्ट जेनरेशन नोकिया हेडसेट देखील सादर करण्यात आले आहेत. ज्यात T4010 T3030, T3010, आणि T3020 अशा तीन ट्रू वायरलेस इयरबड्सचा समावेश आहे. या TWS रेंजची किंमत 1,499 रुपयांपासून सुरु होईल. 

Nokia PureBook S14 चे स्पेसिफिकेशन्स  

Nokia PureBook S14 मध्ये मायक्रोसॉफ्टची नवीन Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. या डिवाइसचे वजन फक्त 1.4 किलोग्रॅम आहे. यात प्रोसेसिंगसाठी 11th Gen Intel Core i5 CPU चा वापर करण्यात आला आहे. त्याला Iris Xe इंटिग्रेटेड गग्राफिक्सची जोड देण्यात आली आहे. हा लॅपटॉप डॉल्बी अ‍ॅटमॉसला सपोर्ट करत. यात 14-इंचाचा फुल-एचडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 82 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह सादर करण्यात आला आहे. या नोकियाच्या नव्या लॅपटॉपमध्ये 16GB पर्यंतचा RAM आणि 512GB NVMe SSD स्टोरेज मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी यात यूएसबी टाईप-सी पोर्ट, एचडीएमआय पोर्ट आणि 3.0 यूएसबी टाईप-ए पोर्ट देण्यात आला आहे.  

टॅग्स :Nokiaनोकियाlaptopलॅपटॉप