शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

नोकिया ८ सिरोक्को भारतात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 17:25 IST

एचएमडी ग्लोबल कंपनीने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये अनावरण केलेला नोकिया ८ सिरोक्को हा स्मार्टफोन आता भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे.

मुंबई - एचएमडी ग्लोबल कंपनीने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये अनावरण केलेला नोकिया ८ सिरोक्को हा स्मार्टफोन आता भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे. एचएमडी ग्लोबल कंपनीने भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच नोकिया १ लाँच करण्यात आल्यानंतर दिल्ली येथील कार्यक्रमात नोकिया ६ (२०१८), नोकिया ७ प्लस आणि नोकिया ८ सिरोक्को हे मॉडेलचे लाँचींग करण्यात आले आहे. या मालिकेत नोकिया ८ सिरोक्को हे मॉडेल प्रिमीयम या प्रकारातील आहे. याचे मूल्य ४९,९९९ रूपये असून २० एप्रिलपासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून याची अगावू नोंदणी करता येणार आहे. ग्राहकांना प्रत्यक्षात हे मॉडेल ३० एप्रिलपासून मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

नोकिया ८ सिरोक्कोमध्ये ५.५ इंच आकारमानाचा, पीओएलईडी या प्रकारचा आणि क्युएचडी म्हणजे २५६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा वक्राकार डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. क्वॉलकॉमचा  ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ८३५ हा अत्यंत गतीमान असा प्रोसेसर यात असेल. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी इतके आहे. तथापि, मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट नसल्यामुळे हे स्टोअरेज वाढविण्याची सुविधा यात दिलेली नाही. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १२ आणि १३ मेगापिक्सल्सच्या झेईस लेन्सयुक्त कॅमेर्‍यांचा समावेश आहे. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. याला ड्युअल टोन एलईडी फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८४ अंशाच्या विस्तृत व्ह्यू अँगलयुक्त ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. या मॉडेलमध्ये बोथी मोड देण्यात आला असून याच्या मदतीने फ्रँट व बॅक कॅमेर्‍यांचा एकचदा उपयोग करणे शक्य आहे. यात वायरलेस चार्जींगच्या सपोर्टने युक्त असणारी ३,२६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा असेल.

नोकिया ८ सिरोक्को या मॉडेलमध्ये मेटलची बॉडी प्रदान करण्यात आली आहे. याच्या जोडीला हा स्मार्टफोन आयपी६७ मानकावर तयार करण्यात आला आहे. अर्थात हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असून तो कोणत्याही प्रकारच्या वातावरणात वापरणे शक्य आहे.