शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नोकिया 8 : ड्युअल कॅमेरा, उत्तम बॅटरी आणि बरेच काही...!

By शेखर पाटील | Updated: August 17, 2017 09:56 IST

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया 8 या फ्लॅगशीप मॉडेललला जगासमोर सादर केले असून भारतात हा स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात उपलब्ध होण्याचे संकेत आहेत.

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया 8 या फ्लॅगशीप मॉडेललला जगासमोर सादर केले असून भारतात हा स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. नोकिया 8 या मॉडेलचे खासियत म्हणजे यातील कॅमेरा होय. यात मागील बाजूस प्रत्येकी 13 मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन कॅमेरे असतील. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. अर्थात याच्या मदतीने दर्जेदार प्रतिमा घेता येतील. विशेष म्हणजे यात कार्ल झाईस या

ख्यातप्राप्त कंपनीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 12 मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. या कॅमेर्‍यांमध्ये बोके इफेक्ट प्रदान करण्याची सुविधा देण्यात आलेली असेल. सर्वात महत्वाचे म्हणजे नोकिया अ‍ॅपच्या मदतीने या स्मार्टफोनच्या कॅमेर्‍यांमधून करण्यात येणारे चित्रीकरण हे थेट फेसबुक/युट्युब आदींसारख्या संकेतस्थळांवर लाईव्ह प्रक्षेपित करता येईल. याहूनही भन्नाट बाब म्हणजे एकाच वेळी मागचे दोन्ही आणि समोरच्या कॅमेर्‍यांना ऑन करून याचे पिक्चर-इन-पिक्चर या पध्दतीने स्ट्रीमींगदेखील याच्या मदतीने करता येणार आहे. याला नोकियाने बोथी हे नाव दिले आहे.

तसेच यात नोकियाच्या ओझो या 360 अंशातील चित्रीकरण करणार्‍या कॅमेर्‍यात वापरण्यात आलेल्या स्पॅटीअल ऑडिओ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अर्थात रेकॉर्डींग करत असणार्‍या भोवतालातील ध्वनीचे यात अतिशय उत्तम पध्दतीने रेकॉर्डींग होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे चित्रीकरण होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. नोकिया 8 या मॉडेलमध्ये कंप्युटेशनल फोटोग्राफी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

नोकिया 8 या मॉडेलमध्ये 5.3  इंच आकारमानाचा आणि 2-के क्षमतेचा एलसीडी आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास 5 चे संरक्षक आवरण असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर असून याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असेल. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यात 128 जीबी स्टोअरेजचा पर्याय असला तरी हे मॉडेल नंतर लाँच करण्यात येणार आहे. यात फास्ट चार्जींग 3.0 तंत्रज्ञानाचा सपोर्ट असणारी 3090 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया 8 हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट 7.1.1   या आवृत्तीवर चालणारा असून याला अवकरच अँड्रॉइड ओ या आवृत्तीचे अपडेट मिळणार असल्याबद्दल कंपनीने आश्‍वस्त केले आहे. नोकिया 8 या मॉडेलचे ब्रिटनमधील मूल्य 599 युरो (अंदाजे 45हजारांच्या आसपास) इतके असेल. हे मॉडेल पुढील महिन्यात ब्रिटनसह अन्य राष्ट्रांमध्ये मिळणार असले तरी भारतात मात्र ते ऑक्टोबरमध्ये लाँच होईल असे संकेत मिळाले आहेत.