शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

असुसच्या झेनफोन मॅक्स प्रो (एम१) मॉडेलची नवीन आवृत्ती

By शेखर पाटील | Updated: July 23, 2018 13:11 IST

असुस कंपनीने आपल्या झेनफोन मॅक्स प्रो (एम१) या मॉडेलची नवीन आवृत्ती लाँच करण्याचे संकेत दिले असून याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

असुस कंपनीने आपल्या झेनफोन मॅक्स प्रो (एम१) या मॉडेलची नवीन आवृत्ती लाँच करण्याचे संकेत दिले असून याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. असुसने एप्रिल महिन्याच्या शेवटी झेनफोन मॅक्स प्रो (एम१) हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज या दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे १०,९९९ आणि १२,९९९ रूपये मूल्यात लाँच केले होते. आता या स्मार्टफोनची वाढीव ६ जीबी रॅम असणारी आवृत्ती लाँच करण्याचे संकेत मिळाले आहेत. यामध्ये ६४ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील उर्वरित फिचर्स हे मूळ आवृत्तीनुसारच असणार आहेत. 

झेनफोन मॅक्स प्रो (एम१) मध्ये तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. अलीकडच्या काळात स्मार्टफोन युजर्स मल्टी-टास्किंगला प्राधान्य देत असतात. या पार्श्‍वभूमीवर, यातील उत्तम बॅटरी ही सेलींग पॉइंट ठरण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये पॅसीव्ह मॅक्स-बॉक्स अँम्प्लीफायर दिलेले असून यामुळे अतिशय उत्तम दर्जाच्या ध्वनीची अनुभूती घेता येते. हा स्मार्टफोन ५.९९ इंच आकारमानाच्या आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज आहे.

झेनफोन मॅक्स प्रो (एम१) या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या अंतर्गत एफ/२.२ अपार्चर, पीडीएएफ, ५ एलीमेंट लेन्स, ८० अंशातील अँगल व्ह्यू लेन्सने युक्त असणारा १३ मेगापिक्सल्सचा एक कॅमेरा आहे. तर यातील दुसरा कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. यात बोके इफेक्ट देण्याची सुविधा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी हा स्मार्टफोन एफ/२.० अपार्चर, ८५.५ अंशाचा अँगल व्ह्यू आदींसह ८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍याने सज्ज आहे. हा स्मार्टफोन २६ जुलैपासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल