शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोझिलाचे नवीन ब्राऊजर लॉन्च, गुगल क्रोमला देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 15:52 IST

मोझिलाने (Mozilla) आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची नवी आवृत्ती लॉंच केली आहे. फायरफॉक्स क्वांटम (Firefox Quantum) असे या आवृत्तीचे नाव असून गेल्या 13 वर्षांत दिल्या जाणा-या या अपडेटमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देफायरफॉक्स ब्राऊजरची नवी आवृत्ती लॉंच गुगल क्रोमला देणार टक्कर 2004 मध्ये फायरफॉक्स 1.0 लॉंच करण्यात आले होते

मुंबई : मोझिलाने (Mozilla) आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची नवी आवृत्ती लॉंच केली आहे. फायरफॉक्स क्वांटम (Firefox Quantum) असे या आवृत्तीचे नाव असून गेल्या 13 वर्षांत दिल्या जाणा-या या अपडेटमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.फायरफॉक्स क्वांटम हा ब्राऊजर विंडोज, मॅक,एन्ड्रॉईड आणि आयओएस या ऑपरेटिंग सिस्टिमसाठी बनविण्यात आला आहे. अतिशय गतीमान असणारे फायरफॉक्स क्वांटम ब्राऊजर सर्व युजर्सला डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे हे ब्राऊजर गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एजला मोठी टक्कर देण्याची शक्यता आहे. मोझिलाने दिलेल्या माहितीनुसार,  फायरफॉक्स क्वांटम या ब्राऊजरचे कोर इंजिन पूर्णपणे नवीन टेक्नॉलॉजीच्या आधारे बदलण्यात आले आहे. डिझाईन सुद्धा नवीन आहे आणि पहिल्यापेक्षा जास्त जलद आहे. 2004 मध्ये फायरफॉक्स 1.0 लॉंच करण्यात आले होते. त्यानंतर अपडेट व्हर्जनमध्ये बदल करण्यात आलेले फायरफॉक्स क्वांटम हे सर्वात मोठे ब्राऊजर आहे. तसेच, या फायरफॉक्स क्वांटम ब्राऊजरमध्ये सुटसुटीत चौरसाकृती टॅब देण्यात आल्या आहेत. तर बुकमार्क, हिस्टरी, स्क्रीनशॉट,डाऊनलोड आदींसाठी यात क्विक अ‍ॅक्सेस प्रदान करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्याच्या अखेरीस मोझिला कंपनीने आपल्या फायरफॉक्स ब्राऊजरची 57वी आवृत्ती डेव्हलपर्स प्रिव्ह्यूच्या माध्यमातून प्रयोगात्मक (बीटा ) स्थितीत सादर केली होती. याला फायरफॉक्स क्वाँटम हे नाव देण्यात आले होते. ही नवीन आवृत्ती आधीपेक्षा जवळपास दुप्पट इतकी गतीमान असल्याचा मोझिलाचा दावा आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान