शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मोझिला फायरफॉक्सचे अँड्रॉइडसाठी स्वतंत्र ब्राऊजर

By शेखर पाटील | Updated: July 11, 2018 15:59 IST

मोझिला फायरफॉक्सने अँड्रॉइड युजर्ससाठी स्वतंत्र ब्राऊजर सादर करण्याचे संकेत दिले

मोझिला फायरफॉक्सने अँड्रॉइड युजर्ससाठी स्वतंत्र ब्राऊजर सादर करण्याचे संकेत दिले असून ते अतिशय गतीमान असण्याची शक्यता आहे.

सध्या मोझिला फायरफॉक्स, गुगलचे क्रोम, मायक्रोसॉफ्टचे एज आणि अ‍ॅपलचे सफारी हे ब्राऊजर आघाडीचे मानले जातात. युजरला गतीमान आणि सुरक्षित वेब सर्फींगची सुविधा पुरविण्यात या सर्व ब्राऊजर्सची नेहमी चढाओढ सुरू असते. यामुळे सर्व ब्राऊजर्स वेळोवेळी नवनवीन अपडेटच्या माध्यमातून आपल्या युजर्सला सुविधा देत असतात. यातच आता फायरफॉक्सने अँड्रॉइडच्या युजर्ससाठी फेनीक्स या नावाने नवीन ब्राऊजर सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. वास्तविक पाहता, मोझिलाचे आधीच अँड्रॉइडसाठी ब्राऊजर असतांनाही नवीन ब्राऊजरची आवश्यकता काय? हा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. तथापि, याचे उत्तर अद्याप तरी मिळालेले नाही. मात्र, टिन एजर्सला आकर्षित करण्यासाठी फेनीक्सला लाँच करण्यात येणार असल्याची माहिती अनेक लीक्सच्या माध्यमातून समोर आली आहे. विशेष करून गिटहब या संकेतस्थळावरील लिस्टींगमधून याबाबत सविस्तर माहिती मिळाली आहे.

फायरफॉक्स ब्राऊजरने अलीकडच्या काळात आपल्या युजर्सला अनेक उत्तमोत्तम फिचर्स दिले आहेत. या अनुषंगाने आपल्या वेब ब्राऊजरसाठी ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी म्हणजे विस्तारीत सत्यता आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजेच आभासी सत्यतेचा सपोर्ट देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यातच आता अँड्रॉइडसाठी स्वतंत्र ब्राऊजरची तयारी ही आश्‍चर्यकारक मानली जात आहे. दरम्यान, तज्ञांच्या मते याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.

टॅग्स :Androidअँड्रॉईड