शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मोटोरोला स्पीअर प्लस : स्पीकर आणि हेडफोनयुक्त टु-इन-वन मॉडेल

By शेखर पाटील | Updated: January 24, 2018 13:08 IST

मोटोरोला कंपनीने ब्ल्यु-टुथ स्पीकर आणि हेडफोन या दोन्ही सुविधा असणारे स्पीअर प्लस हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

मोटोरोला कंपनीने ब्ल्यु-टुथ स्पीकर आणि हेडफोन या दोन्ही सुविधा असणारे स्पीअर प्लस हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.मोटोरोला ऑडिओ प्रॉडक्टचे भारतीय बाजारपेठेसाठी अधिकार असणार्‍या श्याम टेलिकॉम लिमिटेड या कंपनीने स्पीअर प्लस हे मॉडेल लाँच केले आहे. याचे मूल्य १२,९९९ रूपये इतके आहे. खरं तर बाजारात आधीच अत्यंत किफायतशीर दरात ब्ल्यु-टुथ स्पीकर आणि हेडफोन्स उपलब्ध असतांना या मॉडेलचे मूल्य तसे थोडे जास्त आहे. मात्र यातील फिचर्सदेखील याच तोलामोलाचे आहेत. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे यामध्ये गुगल असिस्टंट आणि अ‍ॅपलच्या सिरी या ध्वनी आज्ञावलीवर चालणार्‍या डिजीटल असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आला आहे. यात प्रत्येकी ८ वॅट क्षमतेचे दोन स्पीकर देण्यात आले आहे. तसेच यात संवेदनशील मायक्रोफोनही देण्यात आला आहे. याच्याच माध्यमातून कुणीही व्हाईस कमांडचा वापर करू शकतो. तसेच याच्याशी संलग्न असणार्‍या स्मार्टफोनवरून कॉल करणे अथवा रिसीव्ह करणेही शक्य आहे. याशिवाय, याच्या सोबत अतिशय दर्जेदार असा ब्ल्यु-टुथ कनेक्टिीव्हिटी असणारा हेडफोनही देण्यात आला आहे. यावर याच्याशी संलग्न असणारा स्मार्टफोन, टिव्ही तसेच अन्य उपकरणांमधील संगीताचा आनंद घेता येईल.मोटोरोला स्पीअर प्लस या उपकरणात अतिशय दर्जेदार बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २० तासांचा बॅकअप मिळत असल्याचा कंपनीचा दाव आहे. तर या उपकरणाच्या ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटीची रेंज तब्बल ६० फुटांपर्यंत असल्याचेही मोटोरोला कंपनीने नमूद केेले आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान