शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह Motorola Moto G51 5G देणार का शाओमी-रियलमीला टक्कर? 

By सिद्धेश जाधव | Updated: November 19, 2021 13:01 IST

Motorola Moto G51 5G Phone Price Launch: Moto G51 5G Phone युरोपियन बाजारात स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 120Hz रिफ्रेश रेटसह मोटोरोलाने सादर केला आहे.

Motorola Moto G51 5G Phone Price : Motorola ने फ्लॅगशिपपासून बजेट सेगमेंट पर्यंत स्मार्टफोन आपल्या कालच्या लाँच इव्हेंटमधून सादर केले आहेत. हे स्मार्टफोन कंपनीच्या G Series अंतर्गत युरोपियन बाजारात आणले आहेत. हे फोन्स लवकरच भारतासह जगभरात उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले आहे. कंपनीच्या नवीन 6 स्मार्टफोन्सपैकी Moto G51 5G Phone ची माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.  

Moto G51 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Moto G51 चा कॅमेरा सेगमेंट पाहता, यात LED फ्लॅश असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमधील कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 50MP आहे. ज्याला 2MP च्या मॅक्रो कॅमेरा आणि 8MP च्या अल्ट्रा वाईड अँगल सेन्सरची जोड देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 13MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.  

Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी Moto G51 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये 3.5mm ऑडियो पोर्ट, USB Type-C पोर्ट, गुगल असिस्टंट बटन, IP52 रेटिंग, डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि साइड माउंटेड फिगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. 

Moto G51 स्मार्टफोनमध्ये Qualcomm च्या Snapdragon 480+ SoC ची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. तसेच हा फोन ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU ला सपोर्ट करतो. कंपनीने हा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर केला आहे. या मोटोरोलाच्या 5G Phone मधील स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. 

Moto G51 5G ची किंमत 

Moto G51 स्मार्टफोन 229.99 यूरो मध्ये सादर करण्यात आला आहे. ही किंमत सुमारे 19,349 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा स्मार्टफोन ब्राईट सिल्वर, इंडिगो ब्लू आणि अ‍ॅक्वा ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये विकत घेता येईल.  

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड