शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

Motorola चा धमाका सुरूच! बजेटमध्ये Moto G41 आणि Moto G31 स्मार्टफोन सादर  

By सिद्धेश जाधव | Updated: November 19, 2021 12:03 IST

Motorola Moto G41 And Moto G31 Price Launch: Motorola ने युरोपियन बाजारात Moto G41 आणि Moto G31 हे दोन स्मार्टफोन Mediatek Helio G85 चिपसेट, 6GB पर्यंत RAM, 128GB स्टोरेज आणि 5000mAh बॅटरीसह सादर केले आहेत.

Motorola ने गुरुवारी आपल्या G series अंतर्गत अर्धा डझन स्मार्टफोन सादर केले. यात Moto G41 आणि Moto G31 या बजेट स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या स्मार्टफोन्समध्ये Mediatek Helio G85 चिपसेट, 6GB पर्यंत RAM, 128GB स्टोरेज आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Moto G41 आणि Moto G31 चे स्पेसिफिकेशन्स 

मोटोरोला Moto G41 आणि G31 च्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेक्समध्ये जास्त अंतर नाही. Moto G41 आणि G31 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. G41 मध्ये OIS सपोर्टसह 48MP चा मुख्य कॅमेरा आहे तर, G31 मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर दोन्ही फोनमध्ये 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हे दोन्ही मोटोरोला फोन 13MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. 

Moto G41 स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंतचा रॅम आहे तर Moto G31 4GB पर्यंतचा रॅम मिळतो. दोन्ही फोनमध्ये 128GB पर्यंतचे स्टोरेज ऑप्शन मिळतात. ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये 6.4-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच दोन्ही डिवाइस मीडियाटेकच्या ऑक्टा कोर Helio G85 चिपसेट आणि Mali G52 GPU सह सादर करण्यात आले आहेत.  

Moto G41 आणि G31 स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहेत. G41 मध्ये 30W फास्ट चार्ज सपोर्ट मिळतो तर, G31 मधील बॅटरी 10W फास्ट चार्जिंगने चार्ज करता येते. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 3.5mm ऑडियो पोर्ट, USB Type-C पोर्ट असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात. त्याचबरोबर IP52 रेटिंग आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. 

Moto G41 आणि Moto G31 ची किंमत 

Moto G41 स्मार्टफोन 249.99 यूरो (सुमारे 21,032 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. तर Moto G31 स्मार्टफोनची किंमत 199.99 यूरो (सुमारे 16,825 रुपये) ठेवण्यात आली आहे. सध्या युरोपात आलेले हे दोन्ही मोटोरोला स्मार्टफोन लॅटिन अमेरिका, मिडिल ईस्ट आणि भारतासह आशियात लाँच केले जातील.  

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान